Vivek Lagoo : ज्येष्ठ अभिनेते अन् रिमा लागू यांचे पती विवेक लागू यांचं निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा

Vivek Lagoo Passes Away : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन झालं आहे. आज १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या २० जून रोजी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
Vivek Lagoo Passes Away
Vivek Lagoo Passes Away Saam Tv News
Published On

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन झालं आहे. आज १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या २० जून रोजी विवेक यांच्या पार्थिवावर मुंबईतील अंधेरी परिसरात असणाऱ्या ओशिवरामधील स्मशान भूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचं न भरुन निघणारं नुकसान झालं आहे. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

दरम्यान, विवेक लागू यांचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झालं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीय. हे अद्याप समोर आलेलं नाही. विवेक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या पत्नी रिमा लागू यांचं लग्नाआधीचं नाव नयन बडबडे असं होतं. रिमा यांनी अभिनय करता करता बँकेत नोकरी केली, तेव्हा कलाकारांसाठी खास कोटा होता. बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान त्यांनी आणि विवेक यांची भेट झाली होती. विवेक तेव्हा २३ वर्षांचे होते तर, नयन म्हणजेच रिमा यांचे वय १८ होते. दोन वर्षांच्या प्रेमानंतर ते १९७८ साली लग्नबंधनात अडकले. काही वर्षांनी त्यांच्या नात्यात कटूता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले, त्यांचा घटस्फोट देखील झाला. घटस्फोटानंतरही अभिनेत्रीने रिमा लागू हेच नाव लावलं होतं.

Vivek Lagoo Passes Away
Subodh Bhave : मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेत; संत तुकाराम महाराज यांचा रोल करणार, पहिला PHOTO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com