The Sabarmati Report OTT Release: विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार, कुठे अन् कधी जाणून घ्या…

The Sabarmati Report OTT Update : विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट घरबसल्या पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार जाणून घ्या.
The Sabarmati Report OTT Update
The Sabarmati Report OTT ReleaseSAAM TV
Published On

शोभा कपूर, एकता आर. कपूर, अमूल व्ही. मोहन आणि अंशुल मोहा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा मुख्य भूमिकेत आहेत. ZEE5ने 'द साबरमती रिपोर्ट' (OTT Release) या प्रखर राजकीय नाट्य असलेल्या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. या चित्रपटात भारतातील सर्वात वेदनादायक आणि विवादास्पद दुःखद घटनेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

धीरज सरना दिग्दर्शित या चित्रपटात 2002 मधील गोध्रा रेल्वे जळीत प्रकरणावर निर्भीडपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. या घटनेत साबरमती एक्सप्रेसमधील भीषण हिंसाचारात निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला होता. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड सादर करीत आहे विकीर फिल्म्स प्रॉडक्शनचा 'साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) इतिहास कसा बदलला जाऊ शकतो, सत्य कसे लपवले जाऊ शकते आणि त्या बदलांचे परिणाम पिढ्यान् पिढ्या कसे उमटू शकतात, याची आठवण हा चित्रपट करून देतो.

विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि ऋद्धी डोगरा यांनी या दमदार चित्रपटात अभिनय केला आहे. अनेक नाट्यमय घाडमोडी असलेला हा चित्रपट न्याय, माध्यमांचा प्रभाव आणि सत्याची किंमत यासारख्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यास प्रेक्षकांना भाग पाडतो. 10 जानेवारी रोजी ZEE5 वर 'साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

'द साबरमती रिपोर्ट' कथा

'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात गुजरातमध्ये 2002 मध्ये घडलेल्या गोध्रा ट्रेन जळीतकांडाचा शोध घेणाऱ्या समर कुमार (विक्रांत मॅसी) या हाडाच्या पत्रकारांची गोष्ट सांगण्यात आली आहे. अनेकांचा बळी गेलेल्या या दुर्दैवी घटनेमागील अस्वस्थ करणारी सत्ये समोर येत असताना, समर एका धोकादायक कटकारस्थानाचा उलगडा करतो. या कटात प्रभावशाली व्यक्ती सामील आहेत आणि आपल्या गुपितांचे रक्षण करण्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत, हे तो दाखवून देतो. त्याचा हा शोध मणका राजपुरोहित (रिद्धी डोगरा) थांबवते. पण काही वर्षांनी अमृता गिल या अजून एका रिपोर्टरला या छुप्या रिपोर्टचा छडा लागतो.

सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी समरच्या शोध अहवलाची मदत घेत ते दोघे एकत्रितपणे भ्रष्टाचार आणि फसवणुकीच्या जाळ्याचा उलगडा करतात. हा कट उघड करण्यासाठी सत्याचा शोध घेत असताना त्यांना अनेक धमक्या येतात, धोक्यांना सामोरे जावे लागते. ही थराराची, धाडसाची, भ्रष्टाचाराची आणि न्यायाचा शोध घेण्याची गोष्ट आहे.

'द साबरमती रिपोर्ट'चे दिग्दर्शक धीरज सरना म्हणाले, "या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासातील एका महत्त्वाच्या क्षणाचे प्रामाणिक आणि निर्भीड चित्रण सादर करण्याचा माझा उद्देश होता. प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आणि खूप कौतुक केले. ZEE5 वरील डिजिटल प्रीमियरसह हा चित्रपट अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी मला आशा आहे."

'द साबरमती रिपोर्ट'मध्ये समार कुमारची भूमिका साकारलेला विक्रांत मॅसी म्हणाला, "समर ही व्यक्तिरेखा सत्याचा शोध घेण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. ज्या जगात सत्य अनेकदा चुकीच्या पद्धतीने समोर आणले जाते, अशा जगात सत्याशी प्रामाणिक राहण्यासाठी मिळणाऱ्या आव्हानांचा शोध मला या भूमिकेच्या निमित्ताने घेता आला."

The Sabarmati Report OTT Update
Prasad-Swapnil : 'जिलबी'च्या ट्रेलर लाँच वेळी प्रसाद ओकनं केलं स्वप्नील जोशीचं तोंडभरून कौतुक, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com