Vidyut Jammwal: कपडे न घालताच झाडावर चढला हा बॉलिवूड अभिनेता, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, 'काय गरज...'

Vidyut Jammwal: विद्युत जामवाल हा बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. विद्युतचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. विद्युत झाडावर चढताना दिसत आहे, परंतु त्याने एकही कपडे घातलेले नाहीत.
Vidyut Jammwal
Vidyut JammwalSaam Tv
Published On

Vidyut Jammwal: बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक असलेला विद्युत त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या स्टंट आणि फिटनेससाठी जास्त ओळखला जातो. विद्युत खूप शिस्तबद्ध जीवन जगतो आणि तो इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. तो केरळच्या सर्वात प्राचीन लढाऊ पद्धतींपैकी एक असलेल्या कलारीपयट्टूमध्ये प्रशिक्षित आहे. विद्युत अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ शेअर करतो.

अलीकडेच विद्युतने त्याच्या प्रशिक्षण सत्राचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो झाडावर चढताना दिसत आहे. व्हिडिओमधील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विद्युतने झाडावर चढताना कोणतेही कपडे घातले नव्हते. आता लोक या व्हिडिओवर विविध कमेंट करत आहेत.

Vidyut Jammwal
Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

विद्युत सहजतेने झाडावर चढतोय

व्हिडिओमध्ये, विद्युत सहजतेने झाडावर चढताना दिसतोय. त्याची पाठ वाईट नजरेचा इमोजीने लपवलेली आहे. व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे नग्न आहे. अभिनेत्याने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की, "कलरीपयट्टू अभ्यासक म्हणून, मी वर्षातून एकदा 'सहजा'चा सराव करतो." सहजाचा अर्थ स्पष्ट करताना अभिनेत्याने पुढे लिहिले की, "सहजा म्हणजे तुमच्या मूळ स्थितीत परत येणे, निसर्गाशी जोडणे आणि सखोल संबंध निर्माण करणे."

Vidyut Jammwal
Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

लोकांनी ट्रोल केले

अभिनेत्याने पुढे लिहिले की, "वैज्ञानिकदृष्ट्या, सहजा तुमच्या शरीरातील अनेक न्यूरोसेप्टर्स, प्रोप्रियोसेप्टर्स आणि सेन्सरी फीडबॅक वाढवण्याचे काम करते. हे मानसिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करते." विद्युतचा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. अनेकांनी विद्युतचे समर्थन आणि कौतुक केले, तर काहींनी त्याला ट्रोल केले आणि त्याला टार्झन म्हटले.

रेडिटवर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की विद्युत टार्झन चित्रपटासाठी सराव करत आहे . दुसऱ्याने लिहिले की त्याने त्याच्या कमांडो चित्रपटाचे शीर्षक गांभीर्याने घेतले आहे. आणखी एकाने लिहिले की तो उर्वशी रौतेलाचा मेल व्हर्जन बनत आहे. दुसऱ्याने लिहिले की झाडावर चढण्यासाठी कपडे काढायची काय गरज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com