Ashok Saraf News: कृतज्ञ मी... कृतार्थ मी! ज्येष्ठ रंगकर्मींचा अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान

अशोक सराफ आणि निवेदिता यांची लोकप्रिय जोडी अनेक माध्यमातून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. या लोकप्रिय सराफ जोडीने ज्येष्ठ रंगकर्मींसाठी सन्मानसोहळा आयोजित केला आहे.
ashok saraf
ashok sarafSaam tv
Published On

Ashok Saraf News: मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. या लोकप्रिय जोडीने मोठा काळ गाजवला आहे. आजही ही लोकप्रिय जोडी अनेक माध्यमातून रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. या लोकप्रिय सराफ जोडीने ज्येष्ठ रंगकर्मींसाठी सन्मानसोहळा आयोजित केला आहे. (Latest Marathi News)

काय आहे उपक्रम?

गेल्या वर्षी ४ जून रोजी अष्टपैलू विख्यात नट अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कथन ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले. त्यासाठी लाभलेले प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतासन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक सराफ आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली.

त्यानुसार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मींसाठी सन्मान होणार आहे. त्यास सुभाष सराफ आणि ‘ग्रंथाली’ यांचे सहकार्य आहे.

ashok saraf
Singer Anweshha Debut : इंटरनॅशनल स्टार अन्वेषाचे मराठीत पदार्पण ; सयाजी शिंदेच्या 'पाहिजे जातीचे'मधून करणार नव्या प्रवासाला सुरुवात

दरम्यान, ज्येष्ठ रंगकर्मींसाठीचा सन्मानसोहळा हा शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), येथे करण्याचा योजला आहे.

विष्णू जाधव, सुरेंद्र दातार, शिवाजी नहरेकर, वसंत अवसरीकर, बाबा पार्सेकर, सीताराम कुंभार, प्रकाश बुद्धिसागर, विद्या पटवर्धन आदी वीसेक कलावंतांचा नाट्यकर्मींचा सन्मान अशोक सराफ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, शामराव विठ्ठल को.ऑप. बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चंदावरकर, अल्कॉन एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष अनिल खवटे आणि डॉ. संजय पैठणकर उपस्थित राहतील.

ashok saraf
Narayan Murthy And Kareena Kapoor News: 'इन्फोसिस'च्या नारायण मूर्तींची करिना कपूरच्या कृतीवर तीव्र नाराजी, विमानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमात मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता म्हणून नाट्यपदे गायली जाणार आहेत. मानसी फडके-केळकर व श्रीरंग भावे ती सादर करतील. संहिता अरुण जोशी यांची आहे. अतुल परचुरे व डॉ. मृण्मयी भजक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.

कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पहिल्या आठ रांगा राखीव आहेत, कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका शिवाजी मंदिर येथे दोन दिवस आधी उपलब्ध असेल, अशी माहिती ‘ग्रंथाली’च्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com