Marathi Song: "वाट माझी बघतोय रिक्षावाला" गाण्याचा धमाकेदार रिमिक्स; मराठी गाण्यात हिंदी रॅपचा तडका

Marathi New Song: वाट माझी बघतोय रिक्षावाला हे गाणं २००९ मध्ये प्रसिद्ध झालं होतं. हे गाणं मूळतः रेश्मा सोनावणे यांनी गायलेलं. हे गाणं आजही मराठी संगीताच्या हिट लिस्टमध्ये आहे.
"वाट माझी बघतोय रिक्षावाला" गाण्याचा धमाकेदार रिमिक्स; मराठी गाण्यात हिंदी रॅपचा तडका
MARATHI SONGsaam tv
Published On

प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि तुफान लोकप्रिय ठरलेल्या "वाट माझी बघतोय रिक्षावाला" या गाण्याचा नवा अवतार सादर झालेला आहे. २००९ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे गाणं मूळतः रेश्मा सोनावणे यांनी गायलेलं. हे गाणं आजही मराठी संगीताच्या हिट लिस्टमध्ये आहे.

अशातच आता नव्या बीटवर आणि तुफान हिंदी रॅपच्या जोडीनं परत आलं आहे, गाणं ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ अल्ट्रा म्युझिक आणि कृणाल म्युझिक यांच्या सहयोगाने, सुप्रसिद्ध रॅपर संदीप नेगी यांनी या गाण्याला नव्या शैलीत आणलं असून, दिग्दर्शक सचिन रामचंद्र अंबट यांनी त्याला भव्य दृकश्राव्य रुप दिलं आहे.

"वाट माझी बघतोय रिक्षावाला" गाण्याचा धमाकेदार रिमिक्स; मराठी गाण्यात हिंदी रॅपचा तडका
Pushpa 2 Director house raid : पुष्पा 2 चा डायरेक्टर सुकुमारच्या घरावर 'इन्कम टॅक्स'ची धाड; 'साउथ'चे अनेक सुपरस्टार रडारवर

मराठी गाण्यात हिंदी रॅपचा तडका

या नव्या आवृत्तीत गाण्याच्या पारंपरिक ठेक्याला आधुनिक स्पर्श देण्यात आला आहे. मराठी बीट्स आणि समकालीन हिंदी रॅप यांचा उत्तम मिलाफ असलेल्या या गाण्याला तरुणाईत तुफान प्रतिसाद मिळत आहे. संदीप नेगीच्या जोशपूर्ण रॅपच्या जोडीनं या गाण्याला अधिक दमदार स्वरूप प्राप्त झालं असून, मराठी संगीताच्या परंपरेत एक नवा प्रयोग म्हणून हे गाणं उभं राहील आहे.

व्हिडिओत मीरा जोशी आणि विश्वास पाटील ह्या दोघांनी आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना ठेका धरायला लावलं आहे. व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा रंग कायम ठेवत नव्या जमान्याचं स्पर्श देण्यात आला आहे.

"वाट माझी बघतोय रिक्षावाला" गाण्याचा धमाकेदार रिमिक्स; मराठी गाण्यात हिंदी रॅपचा तडका
Pushpa 3: पुष्पाच्या तिसऱ्या भागात काय घडणार?; सुकुमार यांचं नाव घेत संगीतकार डीएसपी यांनी स्टोरीबाबत सगळंच सांगितलं!

"वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०" या नव्या रिमिक्समध्ये मराठी लोकसंगीताला कायम ठेवत, त्याला समकालीन टच देण्यात आला आहे. त्यामुळे गाण्याच्या मूळ चाहत्यांबरोबरच तरुण पिढीही त्याला तितकाच प्रतिसाद देतेय. अल्ट्रा म्युझिक आणि कृणाल म्युझिक यांनी नेहमीच मराठी संगीताच्या समृद्धतेला पुढे नेण्यासाठी योगदान दिलं असून, लावणी, कोळीगीते, भक्तिगीते आणि पारंपरिक मराठी संगीतप्रकारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com