varun dhawan : 'बेबी जॉन'च्या अपयशानंतर वरुण धवन डिप्रेस? राजपाल यादवने सांगितले सत्य

Varun Dawan Depression : 'बेबी जॉन' हा चित्रपट १८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, परंतु तो बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई करू शकला.
Varun dhawan
Varun dhawanSaam Tv
Published On

varun dhawan : वरुण धवन गेल्या बऱ्याच काळापासून एका हिट चित्रपटाच्या शोधात आहे. नुकताच त्याचा 'बेबी जॉन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. लोकांना वाटले होते की हा चित्रपट पुष्पा २ चा वेग थांबवेल. पण लोकांच्या आशा धुळीस मिळाल्या. या चित्रपटात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव हे कलाकारही दिसले आहेत. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर वरुण धवन डिप्रेशनमध्ये गेला आहे का? या प्रश्नाचे उत्तर नुकतेच राजपाल यादव यांनी दिले. या चित्रपटात त्यांनी कॉन्स्टेबल रामसेवकची भूमिका साकारली होती.

जर चित्रपट रिमेक नसता तर...

एका मुलाखतीत अभिनेता राजपाल यादव म्हणाला की जर हा रिमेक नसता तर माझ्या २५ वर्षांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट असता. पण प्रेक्षकांनी हा चित्रपट आधीच पाहिले होते. रिमेक असल्याने, चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जास्त चांगला चालू शकला नाही.

Varun dhawan
Films On Festivals 2025 : सलमान खान, ईद तर रणबीर कपूर, दिवाळी; या सणांना प्रदर्शित होणार हे मोठे चित्रपट

वरुण डिप्रेशनमध्ये आहे का?

बेबी जॉनच्या अपयशानंतर वरुण 'डिप्रेशन'मध्ये आहे का असे विचारले असता? या प्रश्नाच्या उत्तरात राजपाल यादव म्हणाला, 'वरुण खूप गोड मुलगा आहे, खूप मेहनती आहे. त्याने नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे कारण जोखीम घेणे ही एक मोठी गोष्ट आहे.

Varun dhawan
Third Eye Asian Film Festival : ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने उघडणार थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा पडदा!

५० कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई

२५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'बेबी जॉन'मध्ये कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा इन्स्पेक्टर सत्या वर्मा (धवन) उर्फ ​​बेबी जॉनभोवती फिरते, जो त्याची मुलगी खुशी आणि जुना मित्र राम सेवक (राजपाल यादव) सोबत शांततेत जीवन जगतो. 'बेबी जॉन' हा चित्रपट १८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, परंतु तो बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई करू शकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com