
Varun Dhawan : वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी मुंबईतील जुहू परिसरात ४४.५२ कोटी रुपयांची आलिशान फ्लॅट खरेदी केले आहे. इंडेक्सटॅपने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांवरून हे अपार्टमेंट एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असल्याचे दिसून येते.
माहितीनुसार, या इमारतीचे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. नवीन घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये ५,११२ चौरस फूट कार्पेट एरिया आहे आणि त्यात चार कार पार्किंग स्पेस आहेत. मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत ८७,००० रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.मालमत्तेची नोंदणी ३ डिसेंबर रोजी पूर्ण झाली, वरुणने २.६७ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली.
जुहू आणि वांद्रे भागात, जिथे ही मालमत्ता आहे, तेथे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, काजोल, धर्मेंद्र आणि आमिर खान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. या नवीन मालमत्तेव्यतिरिक्त, वरुण धवनकडे कार्टर रोडच्या सागर दर्शनमध्ये एक अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत सुमारे ६० कोटी रुपये आहे, वरूण आणि नताशाची मुलगी लाराच्या जन्मानंतर, हे कपल जुहू येथील हृतिक रोशनच्या पूर्वीच्या मालकीच्या घरात राहायला गेले होते, ज्यासाठी ते ८.५ लाख रुपये भाडे देत होते.
वरूणच्या कामाबाबतीत, वरुण शेवटचा अॅक्शन चित्रपट बेबी जॉनमध्ये दिसला होता. तो पुढे बोनी कपूरच्या नो एंट्री २ मध्ये दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूरसोबत काम करणार आहे. तो जेपी दत्ता दिग्दर्शित बॉर्डर २ मध्ये देखील दिसणार आहे, ज्यामध्ये सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी आणि इतर कलाकार दिसतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.