Kahitari Vegale: नम्रता आणि तुषार प्रेमासाठी करणार 'काहीतरी वेगळे'; व्हॅलेंटाईन डे ला नवं रोमँटिक गाणं रसिकांच्या भेटीला

Kahitari Vegale New Song: फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच प्रेमाच्या भावना अधिक गडद होऊ लागतात. याच प्रेममय वातावरणात अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे काहीतरी खास आणि वेगळं घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.
Kahitari Vegale New Song
Kahitari Vegale New SongSaam Tv
Published On

Kahitari Vegale New Song: फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच प्रेमाच्या भावना अधिक गडद होऊ लागतात. हवेत एक वेगळीच हुरहूर, उत्सुकता आणि आपुलकी जाणवू लागते. १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेया खास दिवशी अनेकजण मनात दडवलेलं प्रेम व्यक्त करतात, नात्यांना नवी सुरुवात देतात किंवा जुन्या नात्यांमध्ये पुन्हा प्रेमाची ऊब निर्माण करतात. याच प्रेममय वातावरणात अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता तुषार कावळे काहीतरी खास आणि वेगळं घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.

अलीकडच्या काळात नम्रता गायकवाडच्या सोशल मीडियावर तिचे आणि तुषार कावळे यांचे काही रोमँटिक फोटो व्हायरल झाले असून, दोघे एकमेकांना डेट करत आहेत का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चांमागचं खरं कारण म्हणजे या दोघांचं आगामी नवं सोलो गाणं काहीतरी वेगळे, जे थेट व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kahitari Vegale New Song
Rajpal Yadav: राजपाल यादवने कर्जाची अर्धी रक्कम फेडली, उर्वरित पैसे कोण देणार? वकिल म्हणाले...

हे गाणं केवळ एका प्रेमकथेपुरतं मर्यादित नाही, तर आजच्या तरुणाईच्या नातेसंबंधांवर भाष्य करतं. आपण खरंच क्षण जगतोय की फक्त ते सोशल मीडियावर पोस्ट करतोय, हा महत्त्वाचा प्रश्न हे गाणं प्रभावीपणे समोर ठेवतं. युथफुल, वास्तववादी आणि भावस्पर्शी आशय असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

Kahitari Vegale New Song
Don 3: 'जर शाहरुख खान आला तर...'; 'डॉन ३' वादात ४० कोटी वाचवण्यासाठी रणवीर सिंगचा मोठा काउंटर

हे गाणं Flossom Entertainmentच्या बॅनरखाली साकारण्यात आलं असून, संगीत दिग्दर्शन आणि गीतलेखन आरोह कांगो यांनी केलं आहे. देव आहिरराव आणि साक्षी यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. गाण्याचं दिग्दर्शन रोहित जाधव यांनी केलं असून, सह-दिग्दर्शक म्हणून मयूर परांकर यांनी साथ दिली आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून स्वप्नील पाटील यांनी प्रकल्पाची धुरा सांभाळली आहे.

भावना, वास्तव आणि प्रश्नांची सुंदर गुंफण असलेलं ‘काहीतरी वेगळे’ हे गाणं आजच्या पिढीला प्रेम आणि नात्यांकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडणारं ठरणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर हे गाणं तरुणाईमध्ये नक्कीच खास स्थान मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com