Urfi Javed Marriage: उर्फी जावेद आणि ओरी लग्नबंधनात अडकणार? दोघे कॅमेरासमोर नेमकं काय म्हणाले?

Urfi Javed wanted To Marry With Orry: उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद पुन्हा एकदा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Urfi Javed Marriage
Urfi Javed MarriageSaam Tv

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या हटके फॅशन स्टाईलमुळे ओळखली जाते. उर्फी जावेद अनेकदा वेगवेगळ्या स्टाईलचे ड्रेस परिधान करुन पापाराझींसमोर पोझ देताना दिसते. उर्फी जावेद आता एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे उर्फीचे लग्न. उर्फीने पापाराझींसमोर तिला लग्न करायचे असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच उर्फी जावेद पापाराझींसमोर स्पॉट झाली. त्यावेळी तिने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. पापाराझींसमोर तिने म्हटलं की, 'मी लग्न करायला तरयार आहे,परंतु ओरी हो म्हणत नाही. नाहीतर केलं असतं लग्न'. यावरुन सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

यानंतर उर्फी आणि ओरी दोघेही एकत्र स्पॉट होतात. त्यावेळी उर्फी ओरीला किस करते. दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. यानंतर ओरीला त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. त्याला विचारतात की, तू उर्फीशी लग्न करणार का? त्यावर तो म्हणतो उर्फीशी कोण का लग्न करणार नाही? यानंतर हे दोघेही हसायला लागतात. यानंतर हे दोघेही तिथून निघून जातात.

Urfi Javed Marriage
तुलना कोणासोबत करायची याची तरी..., छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या पोस्टवरून Tejaswini Pandit वर नेटकरी संतापले

या दोघेही एकत्र स्पॉट झाल्यानंतर आता त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ओरी आणि उर्फीची जोडी खूप चांगली दिसेल, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांनी लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. याआधीही अनेकजा उर्फी आणि ओरी एकत्र स्पॉट झाले आहे. ते दोघे अनेकदा लग्नाबद्दल बोलताना दिसतात. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Urfi Javed Marriage
Shilpa Shetty And Raj Kundra News : शिल्पा शेट्टी-राजकुंद्राकडून सोने गुंतवणूक योजनेत फसवणूक?; कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com