Urfi Javed Video : उर्फी जावेदच्या 'या' नवीन लूकमुळे चालन झालं कठीण, दोन्ही पाय बांधून बनवला असा व्हिडिओ

बिकिनी परिधान केलेल्या उर्फीने पाय बांधून एक बोल्ड व्हिडिओ बनवला आहे.
Urfi Javed
Urfi Javed Saam Tv

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लूएंसर उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. उर्फी तिच्या प्रत्येक लूक मधील फोटो आणि व्हिडिओ(Social Media) सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेक सोशल मीडिया युजर्स तिच्या बोल्डनेसचे कौतुक करतात तर अनेक युजर्स तिला ट्रोल देखील करतात. कधी उर्फी सेफ्टी पिनचा ड्रेस बनवते तर कधी प्लॅस्टिक फॉइल गुंडाळून कॅमेऱ्यासमोर दिसते. उर्फीने नुकताच एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने काय परिधान केले आहे हे समजणे खूप कठीण आहे. सेक्सी बिकिनी परिधान केलेल्या उर्फीने पाय बांधून एक बोल्ड व्हिडिओ बनवला आहे.

Urfi Javed
Brahmastra 2 : रणवीर सिंग साकारणार देवची भूमिका? करण जोहरचा लाइव्ह चॅटमध्ये खुलासा

तिच्या या व्हिडिओमध्ये उर्फीने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. बिकिनी घालूनही लोकांचे लक्ष तिच्याकडे नाही तर उर्फीच्या पायाकडे आहे. उर्फीने तिच्या पायावर एक विचित्र निळे कापड गुंडाळले आहे, ज्यामुळे उर्फी जावेद एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. व्हिडिओमध्ये उर्फीचा टॅटू देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिचे एक्सप्रेशन खूपच बोल्ड आणि सेक्सी आहेत.

उर्फीने तिचे पाय निळ्या कपड्याने बांधले आहेत. उर्फीने बराच वेळ कापडात गाठी बांधल्या आहेत आणि तिच्याबरोबर तिचे पायही बांधले आहेत. उर्फीने ज्या कापडाने पाय बांधले आहेत ते दुरून फुग्यासारखे दिसते आणि जवळून ते बाहुलीच्या वेणीसारखे दिसते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com