'कान्स'मध्ये रेड कार्पेटवर टॉपलेस झाली महिला; महिलांवरील अत्याचाराविरोधात आक्रोश

Ukrainian Women Get Topless In Cannes Film Festival 2022 : कान्सच्या रेड कार्पेटवर एक महिला आली आणि विवस्त्र होऊन आरडाओरडा करू लागल्याने कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.
Ukrainian Women Get Topless In Cannes Film Festival 2022
Ukrainian Women Get Topless In Cannes Film Festival 2022Instagram/ @fuckzelinskii
Published On

Cannes Film Festival 2022 : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ (Cannes Film Festival 2022) च्या रेड कार्पेटवर एका महिलेने गोंधळ घातला. कान्सच्या रेड कार्पेटवर एक महिला आली आणि विवस्त्र होऊन आरडाओरडा करू लागल्याने कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. या महिलेने आपल्या अंगावर युक्रेनच्या ध्वजाचे रंग लावले होते. 'आमच्यावर बलात्कार थांबवा' असे या महिलेने अंगावर लिहिले होते. यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. (Topless woman storms Cannes red carpet to protest against sexual violence in Ukraine: 'Stop raping us')

हे देखील पाहा -

रेड कार्पेटवर विवस्त्र होऊन ओरडली महिला

हॉलिवूड अभिनेते टिल्डा स्विंटन (Tilda Swinton) आणि इद्रिस एल्बा (Idris Elba) ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या नवीन चित्रपट, थ्री थाउजंड इयर्स ऑफ लाँगिंगच्या (Three Thousand Years of Longing) प्रीमियरसाठी पोहोचले. दरम्यान, अज्ञात महिलेने येऊन अचानक आपले कपडे काढले आणि आरडाओरडा सुरू केला. या महिलेने आपल्या अंगावर युक्रेनच्या ध्वजाचे रंग लावले होते. तसंच लाल रंगाची अंतर्वस्त्र (Ladies Underwear) परिधान केली होती, ज्यावर लाल रंगात खुणा होत्या. या महिलेमुळे रेड कार्पेटवर लोक थांबले होते. यानंतर सुरक्षारक्षकांनी आपल्या काळ्या रंगाच्या जॅकेटने त्या झाकून घटनास्थळावरून दूर नेले.

युक्रेनमध्ये रशियन सैन्याकडून होतायत बलात्कार

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर गोंधळ घालणारी ही महिला प्रत्यक्षात युक्रेनमधील कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. (Russia Ukraine War) अशात युक्रेनमधील महिलांवरील बलात्काराची प्रकरणेही समोर येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात केलेल्या तपासात अनेक बलात्काराच्या घटना उघड झाल्या आहेत. रशियन सैन्य महिलांसोबतच लहान मुलांवरही लैंगिक अत्याचार करत आहे.

Ukrainian Women Get Topless In Cannes Film Festival 2022
पती निक याने प्रियंकाला गिफ्ट केली आलिशान कार; प्रियंका म्हणाली सर्वोत्तम पती

कान्स २०२२ मध्ये युद्ध ही प्रमुख थीम (cannes film festival 2022 theme)

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये युद्ध (War) ही एक मोठी थीम आहे. १९ मे रोजी कान्स २०२२ मध्ये Mariupolis 2 नावाचा माहितीपट दाखवण्यात आला. हे मँटास केवेदारविसियस (Mantas Kvedaravicius) नावाच्या लिथुआनियन दिग्दर्शकाने हा माहितीपट तयार केला होता. गेल्या महिन्यात युक्रेनमध्ये रशियन सैनिकांनी मांटासची (Mantas) हत्या केली होती. महोत्सवाच्या मार्केटप्लेसने शनिवार, २१ मे ला संपूर्ण दिवस युक्रेनियन चित्रपट निर्मात्यांना समर्पित केला आहे. या दिवशी दिग्दर्शक सर्गेई लोझनित्सा ( Sergei Loznitsa) देखील त्यांचा द नॅचरल हिस्ट्री ऑफ डिस्ट्रक्शन (The Natural History of Destruction) हा चित्रपट दाखवणार आहेत. हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या जर्मन बॉम्ब वर्षावावर आधारित आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com