

तमिळ अभिनेता अभिनयचे निधन
वयाच्या ४४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
किडनी आणि लिव्हर इन्फेक्शनमुळे तो गेल्या काही वर्षांपासून त्रस्त होता
आर्थिक अडचणींमुळे त्यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकणारा प्रसिद्ध तमिळ अभिनेता अभिनयचे निधन झाले. अवघ्या ४४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. लिव्हर इन्फेक्शनमुळे तो गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनयच्या मृत्यूचे वृत्त कळताच फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ४ वाजता अभिनयने अखेरचा श्वास घेतला. अभिनय गेल्या अनेक वर्षांपासून किडनी आणि लिव्हरशी संबंधित आजाराने त्रस्त होता. त्याच्या लिव्हरमध्ये इन्फेक्शन खूपच वाढले होते. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अभिनेता उपचार करू शकला नव्हता. त्यामुळे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला मदत केली.
अभिनेता अभिनयच्या कारकिर्दीची सुरुवात २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थुल्लुवधो इलमई' या चित्रपटातून झाली. या चित्रपटात धनुष आणि शेरीन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट हिट झाला आणि अभिनयला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर, त्याने 'जंक्शन', 'सिंगारा चेन्नई' आणि '"पोन मेघलाई' यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. अभिनयला त्याला जास्त काळ मुख्य भूमिका मिळाली नाही. त्याने अनेक दमदार सहाय्यक भूमिका साकारल्या.
अभिनयने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयने डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केले. त्याने अनेक मोठ्या कलाकारांना आपला आवाज दिला. अभिनयच्या अचानक जाण्याने फक्त त्याच्या चाहत्यांनाच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही धक्का बसला आहे. साऊथमधील कलाकार आणि अभिनयचे चाहते सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, मृत्यूपूर्वी अभिनयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने चेक्सचा शर्ट आणि पँट घातली होती. त्याचे वजन खूपच कमी आणि तब्येत खूपच खराब झालेली दिसत होती. तो ओळखीतही येत नव्हता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.