Who Is Actress: अवघ्या 18 व्या वर्षी देशाचे नावे केले मोठे, खिडकीत उभी असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलत का ?

या मुलीने वयाच्या 18 व्या वर्षी असे काम केले होते, ज्यामुळे आपल्या देशाचे नाव जगभरात गाजले होते.
Sushmita Sen Cute Photo Viral
Sushmita Sen Cute Photo ViralSaam Tv

Sushmita Sen Cute Photo Viral: या गोंडस मुलीला ओळखलंत का? हा कोणत्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो आहे सांगू शकाल का? या मुलीने वयाच्या 18 व्या वर्षी असे काम केले होते, ज्यामुळे आपल्या देशाचे नाव जगभरात गाजले होते. 29 वर्षांपूर्वी या मुलीमुळे आपला देश त्या क्षणाचा साक्षीदार बनला होता, तो क्षण पाहिल्यावर आजही प्रत्येक नागरिकाची छाती अभिमानाने उंचावते. सोबत त्या मुलीने बॉलिवूड अनेक हिट चित्रपट देखील दिले होते.

Sushmita Sen Cute Photo Viral
Video : हार्ट अटॅकनंतर Sushmita Sen आली लाईव्ह, अभिनेत्रीची अवस्था पाहून लोक झाले भावुक

ती दुसरी तिसरी कोणी नसून सुष्मिता सेन आहे. खिडकीत उभी राहिलेली गोंडस मुलगी म्हणजे सुष्मिता सेन आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. सुष्मिता सेनचा पहिल्यापासून अभिनयाशी संबंध नव्हता. कुटुंबात असा एकही सदस्य नव्हता ज्याचा अभिनयाशी संबंध होता. तिने मॉडेलिंग म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली आणि अभिनयक्षेत्रात आपला ठसा उमटवला.

Sushmita Sen Cute Photo Viral
Video : हार्ट अटॅकनंतर Sushmita Sen आली लाईव्ह, अभिनेत्रीची अवस्था पाहून लोक झाले भावुक

1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा सुष्मिताने किताब जिंकला. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुष्मिता सेन ही पहिली भारतीय महिला ठरली होती. 29 वर्षांपूर्वी म्हणजेच 1994 मध्ये सुष्मिताने हा मुकुट जिंकून इतिहास रचला होता. सुष्मिता सेनने मिस इंडियाचा ताजही जिंकला होता. तेव्हा ती 18 वर्षांची होती. तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, तिने लग्न केले नसून दोन लहान मुलींना काही वर्षांपुर्वी दत्तक घेत त्यांचे आयुष्य समृद्ध केले.

Sushmita Sen Cute Photo Viral
Amruta Khanvilkar: बापरे काय झालं? अमृता खानविलकरने केलं सोशल मीडियाला बाय बाय?

नुकतीच सुष्मिता सेन तिच्या हेल्थमुळे चर्चेत आली होती. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. नुकतीच तिची अँजिओप्लास्टी झाल्याची तिने माहिती दिली. या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून त्यांनी तिच्या आरोग्यासाठी सर्वच प्रार्थना करीत होते.

सुष्मिता सेनला चाहत्यांकडून मिळालेले प्रेम पाहून तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवत तिने चाहत्यांचे अपार प्रेम पाहून आणि प्रार्थनांसाठी आभार मानले. करिअरबद्दल बोलायचे झाले तर सुष्मिता सेन लवकरच 'आर्य 3' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com