Mahatma Jyotiba Phule Movie
Mahatma Jyotiba Phule Moviesaam tv

Mahatma Jyotiba Phule Movie: महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट बारगळणार? राज्य सरकार सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Big Decision on Mahatma Jyotiba Phule Movie: समितीवर सदस्य नसल्याने आता चित्रपट निर्मिती बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे
Published on

गिरीश कांबळे

Maharashtra Government Discontinue Panel on Movie Mahatma Jyotiba Phule:

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महात्मा फुले यांच्यावर चित्रपट निर्माण करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीत हरी नरके, अरुणा ढेरे, दत्ता भगत, पंढरीनाथ सावंत, सदानंद मोरे यांची तज्ञ म्हणून समितीवर नेमणूक करण्यात आली होती.

परंतु त्यापैकी हरी नरके यांचे निधन झाले. तर अरुणा ढेरे यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी १५ जुलै २०२२ रोजी मुख्य सचिवांनी या सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता समितीतून सदस्यांच्या नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

Mahatma Jyotiba Phule Movie
Aakhri Sach Web Series: तमन्ना भाटिया करणार ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येचा उलगडा: 'आखरी सच' वेबसीरीज प्रदर्शित

समितीवर सदस्य नसल्याने आता चित्रपट निर्मिती बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचा जीवनपट आजच्या तरुण पिढीला काळाने खूप गरजेचे आहे. जर शासनच माघार घेत असले मराठी चित्रपटांना पाठिंबा कोण देणार ?

Mahatma Jyotiba Phule Movie
Jaane Jaan Movie: बॉलिवूडची बेबो ओटीटीवर डेब्यु करणार, ‘जाने जान’मधला करीनाचा ग्लॅमरस लूक पाहिला का?

तर दुसरीकडे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी त्यांच्यावर आधारित जीवनपटाची घोषणा करण्यात आली आहे. समता फिल्म्स प्रस्तुत महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित "सत्यशोधक" चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com