Sudipto Sen On The Kerala Story: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या केरला स्टोरीचा सिक्वेल? दिग्दर्शकाने दिली हिंट

दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी मिळत असलेले घवघवीत यश पाहून दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी दुसऱ्या भागाबद्दल हिंट दिली आहे.
Sudipto Sen On The Kerala Story
Sudipto Sen On The Kerala StorySaam TV

Sudipto Sen On The Kerala Story: सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' ची सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाला देशातील अनेक राज्यांमध्ये विरोधाचा सामना करावा लागत असला तरी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९ व्या दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी मिळत असलेले घवघवीत यश पाहून प्रेक्षकांसमोर आपल्याकडे असलेल्या कथा प्रेक्षकांसमोर आणायची ईच्छा व्यक्त केली. सोबतच सीक्वेलची हिंटही दिली. ई- टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

Sudipto Sen On The Kerala Story
Kapil Sharma's Ramp Walk With Daughter: कपिल-भारतीचा मुलांसह रॅम्पवॉक: व्हिडिओ व्हायरल

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुदिप्तो सेन म्हणाले, “चित्रपटाला मिळत असलेले घवघवीत यश पाहून मी भारावून गेलो आहे. माझ्याकडे अनेक कथा असून त्या माय- बाप प्रेक्षकांसमोर ठेवायच्या आहेत. या चित्रपटाला मिळालेलं कौतुक पाहता आता आराम करायचा नाही. हा चित्रपट यशस्वी होणार हे मला माहित होतं. मी या चित्रपटावर सात वर्षे काम केले होते. माझ्या मेहनतीला यश मिळाले.”

सुदिप्तो सेन यांना चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते, चित्रपटाची कथा केवळ स्रीवादावर (कट्टरवाद) का आधारित आहे, पुरुषांवर आधारित कोणतीच कथा का नाही? यावर दिग्दर्शकांनी सांगितले, 'ही सुरुवातीपासूनच तीन मैत्रिणींची कथा होती, याबाबत कोणतीही पूर्वनियोजित रणनीती नव्हती. मला अनेक निर्मात्यांनी पुरुषांच्या कट्टरतावादावर 'द केरला स्टोरी' आधारित चित्रपट ऑफर केला आहे. लवकरच याचा सिक्वेल येईल.

Sudipto Sen On The Kerala Story
Amitabh Bachchan's Bike Ride: अनोळख्या व्यक्तीसोबत बिग बींची बाईक राईड, बाहेर आले अन् थेट...

'द केरला स्टोरी'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ८.३ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी चित्रपटाने १९.५० कोटींची कमाई केलीय. तर एकट्या रविवारी चित्रपटाने २३.७५ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे अदा शर्मा स्टारर 'द केरला स्टोरी'ने एकट्या भारतात १३६.७४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2023 मध्ये आलेल्या 'पठान', 'तू झुठी में मकर', 'किसी का भाई किसी की जान' नंतर 'द केरला स्टोरी' हा १०० कोटींच्या कलेक्शनमध्ये येणारा सलग चौथा चित्रपट ठरला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com