Viral Video: 'बहरला हा मधुमास' गाण्याची भुरळ सातासमुद्रापलीकडे; विदेशी क्रिएटरचा व्हिडिओ व्हायरल

Baharla Ha Madhumas Video: रिकी यांनी 'बहरला हा मधुमास' या गाण्यावर डान्स करत रील शेअर केला आहे.
 Baharla Ha Madhumas Dance Video
Baharla Ha Madhumas Dance VideoSaam TV

Viral Reel On  Baharla Ha Madhumas: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केदार शिंदे त्यांच्या आजोबांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले आहे.

'बहरला हा मधुमास' या गाण्यावर नाचतानाचा एक व्हिडिओ केदार शिंदे, भारत जाधव आणि अंकुश चौधरी यांनी शेअर केला होता. त्यानंतर अनेक कलाकार या गाण्यावर रील बनवून शेअर करत आहेत.

 Baharla Ha Madhumas Dance Video
Filmfare Award Marathi 2022: फिल्मफेअरमध्ये 'गोदावरी'ने मारली बाजी; पटकावले 'हे' पुरस्कार

रिकी पॉन्ड या विदेशी डान्सर आणि कॉन्टेन्ट क्रियेटरला देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. रिकी यांनी 'बहरला हा मधुमास' या गाण्यावर डान्स करत रील शेअर केला आहे. रिकी यांनी या गाण्यावर खूप सुंदर डान्स केला आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये डान्स कसा वाटला हे देखील विचारले आहे. त्यांच्या या रीलवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. नेटकरी रिकी यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत.

केदार शिंदे आणि सना शिंदे यांनी देखील ही रील त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. 'बहरला हा मधुमास' हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. तर ज्या हुक स्टेप सर्वजण करत आहेत त्याचे श्रेय कृती महेश हिचे आहे. कृती महेशने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

'बहरला हा मधुमास' या गाण्यानंतर 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील 'गाऊ नको किसना' हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com