Pallavi Joshi: 'तुमच्याकडून मला शेवटची अपेक्षा...'; मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिले पत्र

The Bengal Files Controversy: 'द बंगाल फाइल्स' चित्रपटाच्या निर्मात्या आणि विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून 'अनौपचारिक बंदी' हटवण्याची, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची मागणी केली आहे.
Marathi Actress Pallavi Joshi
Marathi Actress Pallavi Joshi Saam Tv
Published On

The Bengal Files Controversy: 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट आज म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्या आणि मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा दावा आहे की बंगालमध्ये या चित्रपटावर 'अनधिकृतपणे बंदी' घालण्यात आली आहे. त्यांनी एका खुल्या पत्राद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गंभीर आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आता फक्त राष्ट्रपतीच त्यांची शेवटची आशा आहेत.

पत्रात काय लिहिले आहे?

पल्लवी जोशी यांनी पत्रात म्हटले आहे की हा 'द बंगाल फाइल्स' हा 'फाईल्स ट्रायलॉजी'चा शेवटचा भाग आहे, जो डायरेक्ट अॅक्शन डे, नोआखली हत्याकांड आणि फाळणीच्या वेदनांचे सत्य दाखवतो. पश्चिम बंगालमध्ये 'सत्य' गुदमरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाची खिल्ली उडवली होती. एवढेच नाही तर पोलिसांनी ट्रेलरचे पोस्टर काढून टाकले आहेत आणि त्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सतत धमक्या मिळत आहेत.

Marathi Actress Pallavi Joshi
Jolly LLB 3: अक्षय-अरशदच्या 'जॉली एलएलबी ३' ला कोर्टाकडून दिलासा; चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

थिएटर मालक घाबरले आहेत

पत्रानुसार, पक्षाचे कार्यकर्ते थिएटर मालकांना धमक्या देत आहेत. अशा परिस्थितीत, ते त्यांच्या चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार देत आहेत. पल्लवी जोशी यांनी राष्ट्रपतींना सांगितले की चित्रपटावर कोणतीही अधिकृत बंदी नाही, परंतु 'अनधिकृत बंदी'मुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दडपण्यात आला आहे.

Marathi Actress Pallavi Joshi
FIR On Sanjay Leela Bhansali: चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

पल्लवी जोशी यांचे आवाहन

पल्लवी जोशी यांनी लिहिले की, "हा चित्रपट सत्यावर आधारित आहे, परंतु सत्यालाही संरक्षणाची आवश्यकता आहे." पश्चिम बंगालमध्ये चित्रपट शांततेत दाखवण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. ती म्हणते, 'तुमच्याकडून मला शेवटची अपेक्षा आहे... कृपया आमच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण करा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com