
मुंबई: 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य हटविण्यात आले आहेत. महिला आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर हे दृश्य आणि ट्रेलर आणि हटवण्यात आले आहेत. महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचा सिनेमा (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) रिलीज होण्याआधीच वादग्रस्त ठरला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार ही महिला आयोगाने केली होती. त्यामुळे अखेर आता या चित्रपटाचा जुना ट्रेलर सोशल मीडियावरुन हटवण्यात आला आहे. (controversial Scenes deleted from Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha marathi movie)
हे देखील पहा -
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिव्या आणि आणि अश्लील दृश्य दाखवली असून एका अल्पवयीन मुलाचे एका महिलेसोबत चुकीचे संबंध या ट्रेलरमध्ये (Trailer) दाखवले असल्याने राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) या चित्रपटावरती आक्षेप घेतल्याने हा चित्रपट (Marathi Movie) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार (Jayant Pawar) यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा आधारित असून सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश यांनी सांभाळली आहे. येत्या १४ जानेवारी म्हणजे उद्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे मात्र त्या आधिच हा चित्रपट वादग्रस्त ठरला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.