Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

Box Office Collection Report: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ प्रदर्शित झाला आहे. तसेच हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या ‘एक दिवाने की दिवानियत’ प्रदर्शित झाला आहे
Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat Collection
Box Office Collectionsaam tv
Published On

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ तसेच हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या ‘एक दिवाने की दिवानियत’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही चित्रपटांनी पहिल्या आठवड्यात मोठी कमाई केली असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘थामा’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार सुरुवात केली होती. आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास ९० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. रविवारी या चित्रपटाने तब्बल १२ कोटींची कमाई केली. तर, रविवारी या चित्रपटाने ४ कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई ९५.५५ कोटी झाली आहे.

Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat Collection
Gangaram Gavankar Passes Away: 'वस्त्रहरण'चे नाटककार काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

दुसरीकडे, ‘एक दिवाने की दिवानियत’ या हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या रोमँटिक ड्रामानेही पहिल्या आठवड्यात समाधानकारक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने एकूण ५२ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाची कमाई अनुक्रमे ९ कोटी, ७.७५ कोटी आणि ६ कोटी इतकी होती. तर, सोमवारी या चित्रपटाने ४ कोटींची कमाई केली.

Thamma vs Ek Deewane ki Deewaniyat Collection
Marathi Couple Divorce: लग्नानंतर वर्षभरातच 'या' मराठी कपलच्या नात्यात दुरावा...; नेमकं कारण काय?

दोन्ही चित्रपटांमध्ये पहिल्या दोन दिवसांत थोडी घट दिसली असली, तरी वीकेंडला पुन्हा कमाई वाढली. ‘थामा’ला अधिक स्क्रीन आणि प्रेक्षकवर्गाचा फायदा झाला, तर ‘एक दिवाने की दिवानियत’ने मर्यादित प्रदर्शनातही चांगला व्यवसाय केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com