Tunisha Sharma: टुनिशाच्या आईचा शीजानवर गंभीर आरोप, कोण आहे शीजान खान?

सध्या पोलिस या प्रकरणाचा आत्महत्या आणि खून या दोन्ही बाजूंनी विचार करत तिच्या आत्महत्येची उकल करीत आहेत.
Tunisha Sharma And Sheezan Khan
Tunisha Sharma And Sheezan Khan
Published On: 

Tunisha Sharma: 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' फेम अभिनेत्री टुनिशा शर्माने (Tunisha Sharma) शनिवारी (24 डिसेंबर) रोजी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये संध्याकाळी गळफास घेत आपले जीवन संपवले. सध्या पोलिस या प्रकरणाचा आत्महत्या आणि खून या दोन्ही बाजूंनी विचार करत तिच्या आत्महत्येची उकल करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात तिच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. टुनिशाच्या आकस्मिक निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

Tunisha Sharma And Sheezan Khan
Tunisha Sharma: २० वर्षीय टीव्ही अभिनेत्री टुनिषा शर्माने संपवले जीवन; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत...

टुनिशा इतक्या टोकाचे पाऊल उचलू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. पोलिसांच्या तपासामध्ये आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टुनिशाच्या आईने टुनिशाचा सहकलाकार आणि मित्र शीजान मोहम्मद खानवर (Sheezan Khan) काही गंभीर आरोप केले आहेत. दोघेही अली बाबा या मालिकेत मुख्य कलाकार म्हणून काम करत होते.

Tunisha Sharma And Sheezan Khan
Himanshi Khurana: बिग बॉस १३ची स्पर्धक हिमांशी खुराना रुग्णालयात दाखल, -7 अंश तापमानात शूटिंग करणे पडले महागात

टुनिशाच्या आईच्या म्हणण्यानुसार, टुनिशा त्याच्यावर नाराज असल्याने तिने एवढे टोकाचे पाऊल उचलले आहे. सोबतच त्यांच्या म्हणण्यानुसार, शीजानला कंटाळून टुनिशाने एवढं मोठं पाऊल उचललं. सध्या टुनिशाच्या आईनेही शीजानविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शीजानने टुनिशाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

शीजान खान कोण आहे?

शीजान मुळ मुंबईचा रहिवासी आहे. मुंबईतच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. अगदी लहान वयातच त्यांने सिनेविश्वात पदार्पण केले आहे. सोबतच शीजानने'जोधा अकबर' या मालिकेमध्ये अकबरच्या बालपणातील भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर टुनिषा आणि शीजानचे अनेक व्हिडिओ आहेत, त्यावरुन त्यांची निखळ मैत्री असल्याचे दिसत आहे. नुकतेच टुनिषाने जागतिक पुरुष दिनानिमित्त त्याच्यासाठी एक खास पोस्टही केली होती, त्या पोस्टनेही त्यांच्या मैत्रीची ओळख करुन दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com