Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती

Marathi Tv Serial TRP Rating : ०४ मे ते १० मे दरम्यानचं टीआरपी रेटिंग कार्ड जाहीर झालेलं आहे. जाणून घेऊया टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी टॉप १० मध्ये बाजी मारली आहे...
Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती
Marathi Tv Serial TRP RatingSaam Tv

टेलिव्हिजन सिरीयल पाहण्याचा प्रेक्षकांचा कल सर्वाधिक आहे. कायमच मालिकांच्या टीआरपीमध्ये चुरस रंगलेली असते. नुकतेच सोशल मीडियावर मालिकेच्या टीआरपीची यादी जाहीर झालेली आहे. ‘मराठी टेलिबझ ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम पेजवर टीआरपी चार्ट शेअर करण्यात आलेला आहे. ०४ मे ते १० मे दरम्यानचा हा टीआरपी चार्ट आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जुई गडकरीची ‘ठरलं तर मग’ सिरीयल आहे. या मालिकेने टीआरपी शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले आहे.

Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती
Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

या मालिकेत मुख्य भूमिकेत जुई गडकरी आणि अमित भानुशाली आहे. सध्या मालिकेमध्ये दोघांच्याही नात्यात काहीही आलबेल सुरू नसल्याचे दिसत आहे. या कथानकाने मालिकेत नवा ट्विस्ट आलेला आहे. मालिकेला टीआरपी यादीत ६.९ इतके पॉइंट्स मिळालेले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर तेजश्री आणि राजची ‘प्रेमाची गोष्ट’ आहे. सध्या ह्या मालिकेतही प्रेक्षकांना वेगवेगळे ट्विस्ट अनुभवायला मिळत आहे.

मालिकेचे कथानक मुक्ता, सागर आणि सावनी यांच्यात भोवती फिरत असल्याचे दिसत आहे. ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेने टीआरपी यादीत ६.६ इतके पॉइंट्स मिळवले आहेत. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आलेली आहे. ह्या मालिकेनेही टीआरपी यादीत आपले स्थान कायम ठेवले आहे. मालिकेला ६.५ इतके पॉइंट्स मिळालेले आहेत.

Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती
Rakhi Sawant Hospitalized: कॅन्सरच्या चर्चादरम्यान राखी सावंतने स्वत:च हॉस्पिलमधून दिले हेल्थ अपडेट, कधी होणार सर्जरी?

चौथ्या क्रमांकावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आहे, तर पाचव्या क्रमांकावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आहे. १६ व्या क्रमांकावर झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका आहे. ह्या मालिकेलाही पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर ‘शिवा’ आणि ‘नवरी मिळे हिटलर’ या मालिकाही टीआरपी यादीमध्ये आलेल्या आहेत. जरीही मालिकेचे टीआरपी चार्टमधील पॉईंटर्स कमी असले तरी सुद्धा मालिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती
Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com