Hardeek Joshi Visit Jejuri: ‘येळकोट येळकोट जय मल्हार...’ लग्नानंतर पहिल्यांदाच हार्दिक- अक्षया खंडोबाच्या दर्शनाला, व्हिडिओ व्हायरल

Hardeek Joshi Akshaya Deodhar News: ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीने जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.
Hardeek Joshi Akshaya Deodhar Visit Jejuri Khandoba Temple
Hardeek Joshi Akshaya Deodhar Visit Jejuri Khandoba TempleInstagram
Published On: 

Hardeek Joshi Akshaya Deodhar Visit Jejuri Khandoba Temple: ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) यांनी गेल्या वर्षी २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. लग्ना आधीदेखील नेहमीच चर्चेत राहिलेलं हे क्यूट कपल लग्नानंतर देखील सोशल मीडियावर या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतेच या क्यूट कपलने जेजुरीच्या खंडोबाचं (Jejuri Khandoba Temple) दर्शन घेतलं आहे. ही जोडी नेहमीच आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत देवदर्शनाला जाण्याचा प्रयत्न करत असतात.

Hardeek Joshi Akshaya Deodhar Visit Jejuri Khandoba Temple
Sonalee Kulkarni Viral Dance Video: गारवाची २५ वर्ष, सोनाली- फुलवाचा जबरदस्त डान्स, दिला गोड क्षणांना उजाळा

ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रिन असलेली ही जोडी प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच हार्दिकने सोशल मीडियावर जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. हार्दिक आणि अक्षयाने लग्नानंतर पहिल्यांदाच जेजुरी गडावर दर्शनासाठी गेले आहेत. यावेळी या नवविवाहित जोडप्याला करावे लागणारे विधी त्यांनी पार पाडले आहेत. हार्दिकने व्हिडीओ शेअर करताना ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असं कॅप्शन दिलं आहे.

त्याच्या खासगी अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओत, त्याने आपल्या लाडक्या बायकोला (अक्षयाला) कंबरेवर उचलून घेत गढ चढताना दिसत आहे. यावेळी गढ चढताना दोघांच्याही चेहेऱ्यावर एक सुंदर हास्य दिसून येत आहे. मंदिरात गेल्यानंतर या दोघांनीही शिवपंडितची जोडीने पूजा आणि अभिषेक केला. यावेळी हार्दिकने मुख्य बाब म्हणजे, जेजुरीची वर्षानुवर्षे चालत आलेल्या खंडोबाची ४२ किलोची खंडा तलवार हार्दिकनं एका दमात उचलली. खंडा उचलतानाचा व्हिडिओ देखील त्याने शेअमणर केला आहे.

Hardeek Joshi Akshaya Deodhar Visit Jejuri Khandoba Temple
Prabhas Look In Project K : प्रभास झाला मार्व्हल सुपरहिरो; 'प्रोजेक्ट के'मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट

गेल्या काही दिवसांपूर्वी हार्दिक जोशी आणि त्यासोबत अनेक मराठी कलाकारांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. एकाच इतक्या सेलिब्रिटींनी पक्षप्रवेश केल्यामुळे सर्वांनाच काही काळासाठी आश्चर्याचा धक्का बसला होता. हार्दिकसोबत यावेळी पत्नी आणि टेलिव्हिजन अभिनेत्री अक्षया देवधरने देखील पक्षप्रवेश केला होता. हार्दिक लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात हार्दिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षयाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अक्षया सध्या तरी कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये नाहीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.