
तमिळ अभिनेता आणि विनोदी कलाकार रोबो शंकर यांचं निधन झालं.
चेन्नईतील खाजगी रुग्णालयात गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेता रोबो शंकरला यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा त्रास होता.
चित्रपटसृष्टीवर हादवणारी घटना घडलीय. अभिनेता आणि कॉमेडियन कलाकार रोबो शंकर याचे निधन झालंय. ते ४६ वर्षांचे होते. चित्रपट आणि टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या रोबो शंकरला कावीळ झाला होता. आठवडा भरापूर्वी त्यांना कावळी झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. याचदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या वृत्तानुसार, अभिनेता रोबो शंकर हे त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध पडले होते.
त्यानंतर त्यांना ओएमआरवर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची तपासणी केल्यानंतर रोबो शंकर यांना यकृत आणि मूत्रपिंडाचा आजार आहे. वैद्यकीय उपचार असूनही त्यांची प्रकृती खालावत होती. शेवटी गुरुवारी रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता रोबो शंकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
वृत्तानुसार अभिनेत्याच्या पार्थिवावर आज शुक्रवारी त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी अंतिम संस्कार आणि अंत्यसंस्कार होतील. अभिनेता रोबो शंकर यांचे कुटुंब, चित्रपट उद्योगातील सहकारी, माजी कलाकार आणि अगदी चाहते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि अंतिम निरोप देण्यासाठी चेन्नईतील निवास्थानी उपस्थित राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.