Famous Actor Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

Famous Actor Passes Away : मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारकीर्दीबद्दल जाणून घेऊयात.
Famous Actor Passes Away
Famous Actor DeathSAAM TV
Published On

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ अभ्यासक, प्राध्यापक आणि दूरदर्शन आयकॉन असलेले सोलोमन पप्पाय्या (Solomon Pappaiah) यांचे निधन झाले आहे. ते जगभरात पट्टीमंद्रम (पारंपारिक वादविवाद कार्यक्रम) लोकप्रिय करण्यासाठी प्रसिद्ध होते. सॉलोमन पप्पाय्या हे एक अभिनेता होते. मात्र दिग्गज तमिळ अभ्यासक आणि टेलिव्हिजन वादविवाद नियंत्रक म्हणून जास्त प्रसिद्ध होते.

सोलोमन पप्पाय्या यांचे ११ सप्टेंबर २०२६ (शुक्रवारी) मदुराई येथील एका खाजगी रुग्णालयात वृद्धपकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. वयाच्या ९० वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे गेल्या आठभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पप्पैया हे मदुराईमधील 'ज्ञानोलिवुपुरम' येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय आणि अभिनेते रजनीकांत यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी सोलोमन पप्पाय्या यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. तसेच सोलोमन पप्पाय्या यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कलाकारमंडळी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

मदुराई येथील 'द अमेरिकन कॉलेज'मध्ये तमिळ विषयाचे प्राध्यापक राहिलेले पप्पैया हे तमिळनाडूतील अत्यंत लोकप्रिय वादविवाद सूत्रसंचालक बनले होते. त्यांनी साहित्यिक आणि सामाजिक चर्चा टेलिव्हिजनच्या माध्यमातून मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवल्या. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०२१ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लेखक, कवी आणि वक्ते म्हणूनही ते ओळखले जात असत आणि तमिळ भाषा व साहित्याच्या प्रसाराशी ते जवळून जोडलेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com