
Susheela-Sujeet Marathi Movie: स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे, यामुळे चर्चेत असलेल्या "सुशीला सुजीत" च्या नव्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी एका समारंभात या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. दमदार अभिनय, खुमासदार प्रसंग आणि खिळवून ठेवणारे संवाद असलेला "सुशीला-सुजीत" हा चित्रपट कॉमेडीचा डब्बल डोस असणार आहे.
ट्रेलर विषयी
एक आई पोलिसांकडे जाते आणि आपला मुलगा हरवलाय म्हणून तक्रार करते. पोलिस तिला घरात भांडण वगैरे काही झालं होतं का, म्हणून विचारतात. पार्श्वभूमीवर आवाज येतो की, मुलगा तब्बल ३५ तासपासून हरवला आहे. एकीकडे स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी एका घरात बंद दाराआड अडकल्याचे पाहायला मिळते. त्यांचे मोबाईल बाहेर राहिले आहेत. त्यांची सुटका करून घेण्याचे नाना प्रकारे प्रयत्न चालू आहेत. लॅच उघडून बाहेर पडायचा, गॅलरीतून काही मार्ग निघतो का पाहायचा प्रयत्न होतो. पण लॅच तुटते, गॅलरीतील कुंडी खाली राहणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडते, अशा अनेक गमतीजमती समोर येतात.
मध्येच अथर्व सुदामे, नम्रता संभेराव पडद्यावर येतात. दोघेही बंद दाराआड अडकल्यावर किंवा चावी घरात राहिल्यावर काय करावे हे सुचवतात. एका प्रसंगात अमृता खानविलकर दिसते. अडकलेले स्वप्नील आणि सोनाली इमारतीच्या खाली असलेल्या लोकांना हाक मारण्याचा प्रयत्न करतात, पण उपयोग होत नाही. स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात हे दोघे आणखी संकट ओढवून घेतात.
सुशीला सुजीत चित्रपटाबाबत
‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ने "सुशीला सुजीत" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. पटकथा व संवाद अजय कांबळे यांचे आहेत. प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाणे, निलेश राठी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.