Rajinikanth Birthday : बापरे! चक्क रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते पैसे, पुढे जे झालं ते...

जाणून घेवूया त्यांच्या आयुष्यातील गाजलेल्या एका किस्स्याबद्दल.
Rajinikanth
RajinikanthSaam TV

Rajinikanth Birthday : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रजनीकांंत (Rajinikanth) यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि एकापेक्षा एक दमदार भूमिकांनी त्यांनी अभिनय जगतात तुफान लोकप्रियता मिळवली आहे. शिवाजी द बॉस मधील शिवाजी गायकवाडची भूमिका असो किंवा रोबोट मध्ये साकारलेला चिट्टी असो प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या प्रतिभावान अभिनयाची छाप पाडली आहे. आज ( १२,डिसेंबर) अभिनेते रजनीकांत यांचा वाढदिवस. जाणून घेवूया त्यांच्या आयुष्यातील गाजलेल्या एका किस्स्याबद्दल.

Rajinikanth
Accident News: चिमुरडा हवेत उडाला अन्‌..; राँगसाईड छोटा हत्तीची दुचाकीला धडक

रजनीकांत हे हिंदी सिने जगतातील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. दाक्षिणात्य सिने जगतात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत असतो. रजनीकांत यांचा शिवाजी द बॉस चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटादरम्यान रजनीकांत यांच्याशी एक असा किस्सा घडला जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हा प्रकार म्हणजे सिनेसृष्टीत थलायवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांना भिकारी समजून एका महिलेने चक्क पैसे दिले होते. २००७ मध्ये हा सगळा प्रकार घडला होता.

यावेळी त्यांचा ‘शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या दमदार यशानंतर रजनीकांत आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिरात गेले होते. मंदिरात गेल्यावर कोणी ओळखू नये, म्हणून त्यांनी त्यांचा पूर्ण लूक बदलला होता. ते अगदी म्हाताऱ्या माणसासारखे तयार झाले होते. मात्र, त्यांच्या सिक्युरिटी टीमला माहिती होते की, जर कोणी रजनीकांत यांना ओळखले, तर गर्दी नियंत्रित करणे खूप कठीण होईल. त्यामुळे मेकअप आर्टिस्टने त्यांचा लूक आणि पोशाख हा म्हाताऱ्या माणसासारखा केला होता.

Rajinikanth
Bigg Boss Marathi 4: स्नेहलता वसईकर बिग बॉसच्या घरातून बाहेर, घरात आणखी काय नवे बदल होणार याची साऱ्यांनाच चिंता

जेव्हा ते साधे कपडे घालून मंदिराच्या पायऱ्या चढत होते, त्यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील पायऱ्या चढत होती. त्या महिलेने जेव्हा त्यांना बघितले, तेव्हा भिकारी समजून दहा रुपयाची नोट काढून रजनीकांत यांना दिली होती. त्यांनी ती नोट काही न बोलता आपल्या खिशात ठेवून घेतली आणि मंदिरामधील देवाच्या दर्शनासाठी गेले. आपल्या खिशातील पर्स काढून आहे तेवढे पैसे त्यांनी देवासमोर ठेवले. ती महिला तिथे थांबून सगळं पाहत होती. नंतर तिने त्यांना खूप निरखून पाहिले, तेव्हा तिला समजले की, हे कोणी दुसरे नाही, तर सुपरस्टार रजनीकांत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com