Sangeet Manapman : 'संगीत मानापमान' चित्रपटाच शंकर महादेवन यांच्या सूमधुर आवजातील ‘ऋतु वसंत’ गाणं प्रदर्शित

Sangeet Manapman Song : 'संगीत मानापमान' या आगामी चित्रपटातील नविन गाणे ‘ऋतु वसंत’ प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामीची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळत आहे.
sangeet manapman
sangeet manapmanPR
Published On

Sangeet Manapman : वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणार एक गाणं नुकतंच प्रदर्शित झाल आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ५००हून अधिक डान्सर्स, पारंपरिक वेशभुषा, उत्तम नृत्य, गाण्यातील साधेपणा थेट मनाला भिडणारे बोल, एवढंच नव्हें तर शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांचे सुमधुर स्वर या गाण्याला चार चाँद लावत आहेत. गाण्यात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी या दोघांची हलकी फुलकी आणि गोड केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळत आहे.

या गाण्याचे बोल समीर सामंत यांनी अतिशय सुंदर लिहिले आहेत. शंकर एहसान लॉय यांचं संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून तरुण पिढीलाही थिरकायला लावेल. एखादा लढा जिंकून आल्यावर जो भाव एका मावळ्याच्या मनात असतो तशीच काहीशी भावना या गाण्यात पाहायला मिळत आहे.

sangeet manapman
Shahid Kapoor - kareena kapoor : शाहिद आणि करीनाचा फोटो झाला व्हायरल; चाहते म्हणतात 'आमचे गीत - आदित्य...'

सुबोध भावे दिग्दर्शित आगामी चित्रपट 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी अशी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" ची म्युझिक कंपनी सारेगामा आहे.

sangeet manapman
Ram Kapoor : 'बडे अच्छे लगते हैं' फेम अभिनेता राम कपूरने ५ किंवा १० नव्हे तर तब्बल ४५ किलो वजन केले कमी, पहा photo

या चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहे. या चित्रपटातील ‘ऋतु वसंत’ हे गाणं प्रेमी युगलांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाले आहे. येत्या नवीन वर्षी म्हणजेच १० जानेवारी २०२५ ला संगीताने नटलेला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com