Ram Kapoor : 'बडे अच्छे लगते हैं' फेम अभिनेता राम कपूरने ५ किंवा १० नव्हे तर तब्बल ४५ किलो वजन केले कमी, पहा photo

Ram Kapoor weight Loss : अभिनेता राम कपूरने त्याच्या वजन कमी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मिडीयावर त्याचे चाहते त्याच्या या आश्चर्यकारक परिवर्तनाची प्रशंसा करत आहे.
ram kapoor weight loss
ram kapoorSaam Tv
Published On

Actor Ram Kapoor : 'बडे अच्छे लगते हैं' फेम अभिनेता राम कपूर याने गुरुवारी सोशल मीडियावर त्यांचे नवीन फोटो पोस्ट करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. युध्र या मालिकेत शेवटचा दिसलेला ५१ वर्षीय अभिनेता गेल्या काही काळापासून सोशल मीडियापासून दूर होता. काही तासांपूर्वी, रामने त्याची पत्नी गौतमी कपूरसोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले, ज्यामध्ये त्याने त्याच्या वजनातील आश्चर्यकारक बदल जगासमोर दाखवले होते. त्याच्या या ट्रान्सफॉर्मबद्दल चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

अभिनेता राम कपूर मधील काही काळात सोशल मिडीयापासून लांब होता. या काळात त्याने ५ किंवा १० नव्हे तर तब्बल ४५ किलो वजन कमी केली आहे. त्याने याबद्दल सोशल मिडीयावर त्याच्या पत्नीसह आणि त्याचा एक सोलो फोटो शेअर करून माहिती दिली आहे. त्याच्या या जबरदस्त चेंजमुळे चाहते त्याचे कौतुक करत आहेत आणि त्याच्या जुन्या लुकची आठवण देखील काढत आहेत.

ram kapoor weight loss
Shahid Kapoor - kareena kapoor : शाहिद आणि करीनाचा फोटो झाला व्हायरल; चाहते म्हणतात 'आमचे गीत - आदित्य...'

सोशल मीडियावर फोटो शेअर करताना रामने लिहिले, "नमस्कार मित्रांनो, इन्स्टावर थोडा वेळ नसल्यामुळे मला माफ करा, मी स्वतःवर खूप काम करत होतो." राम कपूरच्या वजनात अचानक घट झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना अभिनेता करण वाहीने हार्ट इमोजी टाकले. एका चाहत्याने कमेंट केली, “किती मोठा बदल झाला, पण मला तुमचा बडे अच्छे लगते है व्हर्जन आवडला.” राम कपूरच्या फॅन पेजनेही कमेंट केली, “ठीक आहे, आता आम्हाला कळले की सोशल मीडियापासून राम कपूर लांब का होते! राम कपूर धमाका! दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिले होते, “बस! आमचा डिसेंबर संपला.” एका वापरकर्त्याने पुढे लिहिले, “माझा बालपणीचा क्रश पुन्हा एकदा मस्त झाला.”

काही चाहत्यांनी त्याला त्याच्या पूर्वीच्या 'गोलू-मोलू' अवतारातच खूप छान दिसत असल्याचे म्हटले, तर बहुतेकांनी त्याच्या परिवर्तनाचे कौतुक केले. एका चाहत्याने कमेंट केली, "अविश्वसनीय परिवर्तन सर, पण 'बडे अच्छे लगते है' मधील गोलू मोलू राम कपूर म्हणून मस्त होतात आम्हाला तुमचा तो लूक नक्कीच आठवेल." एका चाहत्याने कमेंट केली, तू माझा आणि माझ्या बहिणीचा बालपणीचा क्रश होतास आणि प्रामाणिकपणे तू अजूनही तुझ्या अभिनय कौशल्याने आम्हाला आश्चर्यचकित करतोस.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com