Samantha Ruth Prabhu: समांथाला 'सिटाडेल'च्या सेटवर दुखापत, फोटो शेअर करत दिली चाहत्यांना माहिती...

'सिटाडेल' मध्ये समांथाने बरीच मेहनत घेतली असून सध्या तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.
Samantha Ruth Prabhu Injured
Samantha Ruth Prabhu InjuredInstagram

Samantha Ruth Prabhu Injured: आपल्या कातिल करणाऱ्या नजरेने 'उ वंटा वा मा वां' या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधणारी समंथा सध्या बरीच चर्चेत आहे. कालच समांथाच्या एका नव्या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला. ' सिटाडेल' मध्ये समांथाने बरीच मेहनत घेतली असून सध्या तिची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान तिला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

Samantha Ruth Prabhu Injured
Oscar 2023: ऑस्करमध्ये 'नाटू नाटू'चे गायक सादर करणार लाईव्ह परफॉर्म, पण कलाकारांनी व्यक्त केली मोठी खंत...

समांथाच्या ग्लॅमरस अंदाजाची चर्चा फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर संपूर्ण भारतात आहे. मध्यंतरी तब्येतीमुळे तिने या प्रोजेक्टला नकार दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र ती 'सिटाडेल' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज आणि डीके या सुप्रसिद्ध जोडीने केले असून सध्या चित्रपटाची शूटिंग नैनतालमध्ये सुरू आहे. तिथे चित्रीकरणादरम्यान समांथाच्या हाताला दुःखापत झाल्याची माहिती दिली आहे. समांथाने सोशल मीडिया अकाउंटवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. यात ती ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे.

Samantha Social Media Post
Samantha Social Media PostInstagram

नागा चैतन्यपासून समांथाने घटस्फोट घेत सिंगल लाईफ जगण्याचा निर्णय घेतला. कालांतराने सोबतच तिला ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराचे ही निदान झाले. इतक्या कठीण काळात हताश न होता, स्वत: धीट राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले.

या वेबसीरिजमध्ये तिच्या लूकची झलक पाहायला मिळाली असून ती कोणत्या भूमिकेत दिसणार आहे अदयाप याची माहिती समोर आलेली नाही. या वेबसीरिजच्या माध्यमातून ती हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. तसेच तिचा ‘शाकुंतल’ हा दाक्षिणात्य चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com