RRR at Oscars 2023: दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाच्या शिरपेचात दररोज नवनवे रेकॉर्ड बनत आहेत. यापूर्वी या चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आता या चित्रपटाची ऑस्करवारी होणार आहे. ऑस्करमध्ये या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याचे गायक राहुल सिपलीगंज आणि काल भैरव गाणं सादर करणार आहेत.
ऑस्करमध्ये RRR चित्रपटाला एक नाही, दोन नाही तब्बल चार पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. सध्या चित्रपटाची टीम अमेरिकेत प्रमोशनमध्ये बरीच व्यग्र आहे. ऑस्करमध्ये या गाण्याचे गायक परदेशात आपले गाणं सादर करणार आहेत.
12 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑस्कर 2023 मध्ये गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव या गाण्यावर लाईव्ह परफॉर्म करणार आहे. गाण्याचे गायक हे गाणे लॉस एंजेल्समध्ये डॉल्बी थिएटरमध्ये थेट गाणं सादर करणार आहे. या गाण्याचे संगीत एमएम किरावानी यांचे असून हे गाणे रिहाना, लेडी गागा, मित्स्की, डेव्हिड बायर्न आणि डायन वॉरन यांच्या विरुद्ध 'बेस्ट ओरिजिनल सॉन्ग'च्या यादीत स्पर्धेत आहे.
अभिनेता राम चरणला ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्म करण्याची इच्छा असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. स्वत: अभिनेत्यानेही यावर प्रतिक्रिया दिली असली तरी, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की 'ज्या गाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहेत, त्या गाण्यावर आम्हाला कुठेही परफॉर्म करायला नक्की आवडेल. मात्र, आम्हाला सर्वत्र परफॉर्म करण्याची संधी मिळत नाही. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जर आम्हाला त्यावर डान्स करण्याची संधी मिळाली तर, आम्हाला आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना अधिक आनंद होईल.' चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे राम चरण आणि जूनियर एनटीआर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यावरील त्या दोन्ही स्टार्सच्या डान्स पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.