South Actor Death: साऊथ सिनेसृष्टीला मोठा धक्का, प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Kundara Johny Death: केरळच्या कोल्लम येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
Kundara Johny Death
Kundara Johny DeathSaam Tv
Published On

Kundara Johny Dies:

साऊथ सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते कुंदारा जॉनी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केरळच्या कोल्लम येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंदारा जॉनी यांना मंगळवारी हृदविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ केरळ येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्याच्या निधनानंतर केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाळ यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, 'जॉनी यांनी त्यांच्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले'.

कुंदारा जॉनी यांनी १९७९ मध्ये नित्या वसंतम'या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. कुंदारा यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये वेगवगेळ्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी किरीदम (Kireedam) आणि चेनकोल (Chenkol) या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यात. त्यांच्या या भूमिकेचे खूपच कौतुक झाले होते. त्यांनी मल्याळमसोबतच तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले. वाहकाई चक्रम (Vaazhkai Chakram) आणि नदीगन (Nadigan) या तमिळ चित्रपटात त्यांनी काम केले होते.

Kundara Johny Death
Ashish Bende Post: “सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला कमी पडलो…” ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाने खंत व्यक्त करत शेअर केली पोस्ट

मोहनलाल स्टारर 'किरीडम' चित्रपटामधील कुंदारा जॉनीच्या परमेश्वरन या पात्राचे खूपच कौतुक झाले होते. '15 ऑगस्ट', 'हॅलो', 'अवन चंदियुडे माकन', 'भार्गवचरितम मुनम खंडम', 'बलराम vs थरदास', 'भरत चंद्रन आयपीएस', 'दादा साहेब', 'क्राईम फाइल', 'थचिलेदथ चुंदन', 'समंथाराम', 'वर्णप्पाकित', 'सागरम साक्षी' आणि 'अनवल मोथिराम' या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्यात.

Kundara Johny Death
Saleel Kulkarni Post: “हा पुरस्कार तुमचा आहे...”, ‘एकदा काय झालं’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शकांनी‘या’ दोन व्यक्तींना दिले श्रेय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com