Hbd Kriti Kharbanda
Hbd Kriti KharbandaSaam Tv

Hbd Kriti Kharbanda: एका फोटोमुळं संपूर्ण आयुष्यचं बदललं; अभिनेत्री होण्याआधी 'या' क्षेत्रात करायची काम

Kriti Kharbanda Biography: साऊथसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री क्रिती खरबंदा.
Published on

साऊथसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री क्रिती खरबंदा. क्रितीने साऊथ चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. यानंतर आता बॉलिवूडमध्येही अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे. अशातच आज क्रिती तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने क्रितीच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

Hbd Kriti Kharbanda
Salman Khan: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, २० वर्षाच्या तरुणाला नोएडातून अटक

क्रितीचा जन्म २९ ऑक्टोबर १९९० मध्ये पंजाबी कुटुंबात झाला. क्रितीला आई, वडील आणि एक बहिण- भाऊ असा परिवार आहे. तिच्या वडिलांचं नाव अश्वानी खरबंदा आहे तर आईचं नाव रजनी खरबंदा आहे.

लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या क्रितीने शालेयवयात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायची. शाळेत असताना क्रितीला जाहिरातींच्या ऑफर येत होत्या. दरम्यान तिने, शाळा आणि कॉलेजमध्ये असताना जाहीरातीमध्ये काम केलं. क्रितीने अनेक टिव्ही जाहीराती केल्या आहेत. भीमा ज्वेलर्स, स्पार, फेअर अँड लव्हली अशा ब्रॅण्डसाठी जाहिराती केल्या आहेत.

कॉलेजमध्ये शिकत असताना क्रितीने मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने बराच काळ मॉडेलिंग केले. स्पारच्या बिलबोर्डवर क्रितीचा फोटो बघून एन आर आय दिग्दर्शक राज पिप्पाला यांनी तिला त्यांच्या सिनेमासाठी कास्ट केलं. राज पिप्पाला हे त्यांच्या प्रोजेक्टसाठी अभिनेत्री शोधतच होते. तेव्हा त्यांनी स्पारच्या बिलबोर्डवर क्रितीचा फोटो बघितला आणि त्यांनी तिला कास्ट केलं. क्रितीने अनेकदा तिच्या मुलाखतीमध्ये, मला अभिनेत्री होण्याचं काहीही हेतू नव्हता, मी फक्त जाहिराती करायचे. माझ्या आईने मला या ऑफरचा गंभीरपणे विचार करण्याचा सल्ला दिला आणि मी अभिनय क्षेत्रात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com