Kantara 2 : नदीत पोहायला गेला अन्…, ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू

Kantara 2 Junior Artist Death : 'कांतारा 2' चित्रपटातील ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू झाला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Kantara 2 Junior Artist Death
Kantara 2SAAM TV
Published On

'कांतारा' चित्रपट खूप गाजला. चाहत्यांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. आता चाहते 'कांतारा 2' ची (Kantara 2) आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या 'कांतारा 2' चे शूटिंग सुरू आहे. 'कांतारा 2'च्या शूटिंगच्या सेटवरून मोठी बातमी समोर आली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांच्या चित्रपटाच्या सेटवरील एका ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू झाला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, 'कांतारा 2'मध्ये काम करत असलेल्या ज्युनिअर आर्टिस्ट कपिलचा मृत्यू झाला आहे. तो केरळमध्ये राहणार होता. मंगळवारी (७ मे) रोजी दुपारी कोल्लूरमधील सौपर्णीका नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. जेवल्यानंतर तो नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. स्थानिक अग्निशमन विभागाने त्याचा शोध घेतला. तेव्हा संध्याकाळी त्याचा मृतदेह नदीत सापडला.

आता याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. कोल्लूर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. कपिल या ज्युनिअर आर्टिस्टच्या निधनाने 'कांतारा 2' च्या सेटवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे. 'कांतारा 2' च्या कलाकारांना सुरुवातीपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा 2' चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता वाढवली आहे. 'कांतारा 2'ला 'कंतारा: अध्याय 1 - ए लीजेंड' असं नाव देण्यात आले आहे. टीझरमधील ऋषभ शेट्टीच्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. हातात त्रिशूल आणि रक्ताने माखलेले शरीर, गळ्यात रुद्राक्ष आणि लांब केस अशा अवतारात ऋषभ शेट्टी पाहायला मिळत आहे. अंगावर शहारे आणणारा हा लूक आहे.

Kantara 2 Junior Artist Death
Aishwarya Narkar : "दूध का दूध,पानी का पानी...", ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com