Famous Songwriter Death: प्रसिद्ध गीतकाराचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Bobby Hart Passes Away: मंकीज पॉप बँडचे दिग्गज गीतकार आणि निर्माते बॉबी हार्ट यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले.
Songwriter bobby hart passed away at the age of 86
Songwriter bobby hart passed away at the age of 86Saam Tv
Published On

Famous Songwriter Death: प्रसिद्ध गीतकार बॉबी हार्ट यांचे निधन झाले आहे. हे गीतकार बॉयस आणि हार्ट या प्रसिद्ध गीतलेखन जोडीचा भाग होते. ते 'द मंकीज' साठी काही अतिशय हिट गाण्यांसाठी ओळखले जात होते, "आय वाना बी फ्री" आणि "लास्ट ट्रेन टू क्लार्क्सविले" सारखी प्रसिद्ध गाणी त्यांना लिहीली. गीतकाराचे वयाच्या ८६ व्या वर्षी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी निधन झाले.

पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केले

डॉन किर्शनर यांनी टेलिव्हिजनसाठी तयार केलेल्या 'द मंकीज'च्या सोशल मीडिया हँडलवर भावनिक श्रद्धांजलीसह ही बातमी केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'एक अतिशय दुःखद बातमी, दिग्गज गीतकार बॉबी हार्ट ज्यांनी मंकीजची अनेक गाणी लिहीले आहेत त्यांचे निधन झाले आहे.

Songwriter bobby hart passed away at the age of 86
'पीछे तो देखो' फेम सोशल मीडिया स्टारच्या लहान भावाचं निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

त्यांचा जोडीदार टॉमी बॉयस सोबत, बॉबीने "आय वाना बी फ्री", "लास्ट ट्रेन टू क्लार्क्सविले" आणि इतर अनेक ट्रॅक लिहिली आहेत. याशिवाय, त्यांनी लिटिल अँथनी आणि द इम्पीरियल्ससाठी "हर्ट्स सो बॅड" सारख्या हिट गाणी देखील लिहीली आहेत. 'त्यांचे नेहमी आठवणीत राहिलं.'

Songwriter bobby hart passed away at the age of 86
Farah Khan: तुम्ही आणि सलमान खान एक सारखे...; फराह खानने का केली बाबा रामदेवची सलमान खानशी तुलना

बॉबी हार्ट

बॉबी हार्टचा जन्म १८ फेब्रुवारी १९३९ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत न्यू एडिशन सारख्या कलाकारांसोबत काम केले आणि टेंडर मर्सीजच्या ऑस्कर-नामांकित गाण्यातही योगदान दिले. हार्टचा जोडीदार टॉमी बॉयस यांचे १९९४ मध्ये निधन झाले. परंतु २०१४ च्या माहितीपट "द गाईज हू रॉट एम" मधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. हार्टचे लग्न मेरी अँन हार्टशी झाले आहे आणि त्यांना दोन मुले आहेत. गीतकाराच्या जाण्याने संगीत जगात एक पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com