Nupur Sanon: प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण अडकणार विवाहबंधनात; या करोडपती गायकाने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

Nupur Sanon: कृती सॅननची बहीण नुपूर सॅननच्या लग्नाच्या अफवांनी बी-टाउन गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, नुपूरने आता त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे आणि त्यांच्या प्रपोजचे फोटो शेअर केले आहेत.
Nupur Sanon
Nupur SanonSaam Tv
Published On

लग्नाच्या अफवांमध्ये, अभिनेत्री कृती सॅननची बहीण, अभिनेत्री नुपूर सॅननने अखेर तिच्या नात्याची पृष्ठी केली आहे. तिने तिच्या प्रियकर आणि गायक स्टेबिन बेनला हो म्हटले आहे. नुपूरने प्रपोजलचे फोटो शेअर करताना ही माहिती दिली. तिने असेही म्हटले आहे की हे तिने आतापर्यंत म्हटलेले सर्वात सोपे हो होते.

स्टेबिनने गुडघ्यावर बसून प्रपोज केले

नुपूर सॅननने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे. यामध्ये प्रपोजलचे सुंदर फोटो दाखवले आहेत. पहिल्या फोटोमध्ये, स्टेबिन बेन एका गुडघ्यावर नुपूरला प्रपोज करताना दिसत आहे, ज्याच्या मागे "तु माझ्याशी लग्न कराशील का" असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, नुपूर तिची अंगठी दाखवत आहे.

Nupur Sanon
Amitabh Bachchan: केबीसीच्या मंचावर बिग बींच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाले, 'सगळं काही जणू कालच घडल्यासारखं...'

तिसऱ्या फोटोमध्ये, कृती सॅनन नुपूर आणि स्टेबिनला मिठी मारताना दिसत आहे. कृतीचा चेहरा दिसत नसला तरी, ती कृती सॅनन असल्याचे दिसते. नुपूरने व्हिडिओ कॉलवर तिच्या पालकांना याबद्दल माहिती दिल्याचा फोटो देखील आहे. नुपूरने व्हिडिओ कॉलमधील एक फोटो देखील शेअर केला. हे फोटो शेअर करताना नुपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, " मला हो म्हणण्याचा सर्वात सोपा मार्ग मिळाला."

Nupur Sanon
Actor Accident: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा भयानक अपघात; भरधाव दुचाकीने उडवले, पत्नीच्या डोक्याला जबर मार

११ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये होणार लग्न

हा प्रपोजल एका सुंदर बोटीवर पार पडला. या खास क्षणासाठी नुपूरने सुंदर फुलांचा ड्रेस घातला होता. तर स्टेबिन निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला होता. नुपूर आणि स्टेबिनच्या लग्नाच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत. वृत्तानुसार, नुपूर आणि स्टेबिन ११ जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करू शकतात. हे लग्न एका खाजगी समारंभात होणार आहे, त्यानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com