सिद्धू मूसेवालाच्या आई-वडिलांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; हत्येच्या चौकशीची मागणी

Sidhu Moosewala : मूसेवाला यांच्या वडिलांनी शाह यांना पत्र लिहून त्यांच्या मुलाच्या हत्येची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.
Singer Sidhu Moosewala Father And Mother Meets Amit Shah In Chandigarh
Singer Sidhu Moosewala Father And Mother Meets Amit Shah In ChandigarhTwitter/@ANI
Published On

मानसा, पंजाब : पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांची २९ मे ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्या (Murder) झाल्याच्या काही दिवसांनंतर, आता त्यांच्या पालकांनी शनिवारी चंदीगडमध्ये गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. मूसेवाला यांच्या वडिलांनी शाह यांना पत्र लिहून त्यांच्या मुलाच्या हत्येची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मूसा गावात मूसेवालाच्या पालकांची भेट घेतली होती. (Singer Sidhu Moosewala Father And Mother Meets Amit Shah In Chandigarh)

हे देखील पाहा -

पंजाबमधील काँग्रेस नेते, प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांची रविवारी (२९ मे) गोळी घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. या घटनेने पंजाबमध्ये खळबळ उडाली. पंजाबच्या (Punjab) मनसाजवळील जवाहरके गावात मूसेवाला यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला. या घटनेत दोन जण जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गायक मूसेवाला यांना गँगस्टर लोकांनी धमकी दिली होती. त्यानंतर पंजाबच्या आम आदमी सरकारने मूसेवाला यांना ४२४ व्हीआयपी सुरक्षा पुरवली. मात्र, सरकारने एका दिवसात ही सुरक्षा मागे घेतली. आज मूसेवाला यांच्यावर जवाहरके गावात जीवघेणा गोळीबार झाला. मूसेवाला यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, मूसेवाला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Singer Sidhu Moosewala Father And Mother Meets Amit Shah In Chandigarh
Instagram Reels बनवण्याची पद्धत बदलली; जाणून घ्या नवीन फीचर कसे काम करते

सिद्धू मूसेवाला कोण होते ?

सिद्धू मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव हे शुभदीप सिंह सिद्धू होते. मूसेवाला यांचे लाखो चाहते होते. सिद्धू हे गँगस्टर रॅपसाठी लोकप्रिय होते. मूसेवाला यांची आई या गावाच्या सरपंच आहेत. मूसेवाला यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूसावाला यांनी गायन कला शिकली आणि कॅनडा देशात गेले.

मूसेवाला हे पंजाबमधील वादग्रस्त गायक म्हणून ओळखले जायचे. मूसेवाला हे खुलेआम पिस्तूल बाळगण्याचा संस्कृतीला गायनातून प्रोत्साहन द्यायचे. तसेच गँगस्टर लोकांवर गाण्यातून टीका करायचे. शीख योद्धे यांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी मूसेवाला यांना माफी देखील मागावी लागली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com