Nakhrewali Song Released: रोहित राऊतचं गावरान ठसकेबाज ‘नखरेवाली’ रिलीज, गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Rohit Raut Nakhrewali Song Out: गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती एक गावरान मराठमोळं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.
Nakhrewali Song Released
Nakhrewali Song ReleasedSaam Tv
Published On

Nakhrewali Song Released

मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय गायक रोहित राऊत नेहमीच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या स्टाईलच्या जोरावर आणि आपल्या आवाजाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकतंच गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती एक गावरान मराठमोळं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यामध्ये आपल्याला काही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर दिसत आहेत.

Nakhrewali Song Released
Shaitaan Advance Booking: अजय देवगणच्या 'शैतान'ने रिलीजपूर्वीच केली बक्कळ कमाई, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले इतके कोटी

या गावरान मराठमोळ्या गाण्याची आणि त्याच्या हूकस्टेप्सचीही चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. गाण्याची चाल ऐकून नक्कीच चाहत्यांचे पाय आपोआप थिरकायला लावणारे आहेत. या गाण्यात निक शिंदे, रितेश कांबळे, अनुश्री माने आणि जाऊ बाई गावात या मराठी रिऍलिटी शोची फायनलिस्ट अंकिता मेस्त्री सुद्धा दिसत आहे.

गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे हिने गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याला संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरवने दिले आहे. तर गाण्याचे दिग्दर्शन रोहित जाधवने केलं आहे.

अभिनेता विशाल निकम, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव अविनाश सोलवट आणि अन्य कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाण्याचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला.

गायक रोहित राऊत ‘नखरेवाली’ गाण्याविषयी सांगतो, “जेव्हा प्रशांत सरांचा मला कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मराठी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात टॉपची गाणी प्रशांत सरांची असतात. आणि त्यांच्यासोबत माझ हे पहिलच गाण आहे. हे गाण रेकॉर्ड करतानाही मला खूप मज्जा आली. हे गाणं खूप एनर्जेटिक झाल आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हे गाण नक्कीच आवडेल.”

Nakhrewali Song Released
Prajakta Mali Video: 'जेव्हा वेडी माणसं एकत्र येतात!...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमची ऑस्ट्रेलियात धम्माल, शेअर केला भन्नाट व्हिडीओ

संगीतकार प्रशांत नाकती गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “हे गावरान मराठमोळं लव्ह सॉंग आहे. मुलींचा निरागस आणि सोज्वळ नखरा टिपणार हे गाणं आहे. या गाण्याचं चित्रीकरण नाशिकच्या एका सुंदर गावात झालेल आहे. आजचा काळ मॉडर्न झाला आहे तरीपण गावकडचं निरागस प्रेम वेगळ्या रितीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. दरवर्षी पाच मार्चला २०२१ पासून गाणं प्रदर्शित करत आहे. यावर्षीही २०२४ ला मी रसिक प्रेक्षकांसाठी ‘नखरेवाली’ हे गाणं घेवून आलो आहे. या गाण्यावर प्रेक्षक मायबाप सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रेम देत आहेत. त्यांचं असच प्रेम कायम मिळो.”

Nakhrewali Song Released
Kanni Movie New Song: मैत्रीचा अर्थ समजून सांगणारे 'कन्नी'तील 'यारा रे' गाणं रिलीज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com