Radhika Bhide: हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाव खाऊन जाणारी कोकणकन्या राधिका भिडे आहे तरी कोण? VIDEO होतोय व्हायरल

Radhika Bhide: ‘आय पॉपस्टार’ या हिंदी संगीत रिअॅलिटी शोमध्ये ती सहभागी झाली आहे आणि तिच्या गाण्याने प्रेक्षकांचे मन जिंकले.
Radhika Bhide
Radhika BhideSaam Tv
Published On

Radhika Bhide: बुधवारी, कोकणातील गावी वाढलेल्या राधिका भिडेंने संगीत-विश्वात उल्लेखनीय कामगीरी केली आहे. ‘आय पॉपस्टार’ या हिंदी संगीत रिअॅलिटी शोमध्ये ती सहभागी झाली आहे आणि तिच्या 'मन धावतया' गाण्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. या शोमध्ये स्पर्धकांना विविध थीमवर गाण सादर करायचं होतं आणि राधिकाने आपली शैली, आत्मविश्वास खूप चपखल दाखवला आहे.

मिडियात येणाऱ्या अहवालानुसार, राधिकाने मराठीतील पॉप गाणे सादर केले. हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या सोशल-मिडियावरील फॉलोअर्सनी झपाट्याने वाढत आहेत. यामुळे तिच्या करिअरची दिशा मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता दिसते. संगीत निर्माते आणि जज तिच्या सादरीकरणानंतर फारच खूश होते.

Radhika Bhide
Bigg Boss 19: अशनूर आणि अभिषेकवर बिग बॉस नाराज; 'हा' नियम तोडल्यामुळे दिली एविक्शनची शिक्षा

राधिका सांगते की, “माझं संगीत हे माझ्या कोकणी मूळाशी जोडलेलं आहे, पण माझ्या आतली आवाज जागतिक रंगमंचावर दाखवायचा आहे.” अशा दृष्टीने ती पॉप, प्लेबॅक आणि वेब-सिरीज गाणी शोधत आहे. मला स्वतःची गाणी सादर करायची होती, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यासपीठाच्या शोधात होते, तो या कार्यक्रमामुळे मिळाला आहे. राधिकानं रिअॅलिटी शोच्या आधी हिंदी सीरिज 'ताजा खबर २' आणि 'दे धक्का २' व 'हर हर महादेव' या मराठी सिनेमांसाठी बॅकग्राऊंड स्कोरिंग आणि व्होकल प्रॉडक्शनचं काम पाहिलं आहे. 

Radhika Bhide
Satish Shah Last Rites: सतीश शाह यांना अग्नी देताना कलाकार मित्रांनी गायलं 'हे' गाणं; कारण सांगत म्हणाले...

ओटीटीवरील 'आय पॉपस्टार' या कार्यक्रमात देशातील विविध भागांमधून निवडलेल्या स्पर्धकांना स्वतः गाणी लिहून, त्याला संगीत देऊन ती परीक्षकांसमोर सादर करायची आहेत. यामध्ये जो स्पर्धक उत्तम सादरीकरण करेल शेवटी तो विजेता ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com