

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पंजाबमध्ये अडवण्यात आला होता. याप्रकरणी भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबात काळजी व्यक्त करत या घटनेचा निषेध करणारं ट्विट सायनाने केलं होतं. सायनाच्या (Saina Nehwal) या भूमिकेवर टीका करत अभिनेता सिद्धार्थ सुर्यनारायण (Siddharth Suryanarayan) याने आक्षेपार्ह शब्दांत ट्विट केलं होतं. यामुळे नवा वाद निर्माण होऊन अभिनेता सिद्धार्थवर चौफेर टीका होऊ लागली होती. अखेर त्याने आता सायना नेहवालची माफी मागितली आहे. सोशल मिडीयावर पत्र सार्वजनिक करत त्याने सायनाची माफी मागितली आणि तु माझी नेहमी चॅम्पियन राहशील असंही तो म्हणाला आहे. (Siddharth apologises to Saina Nehwal)
हे देखील पहा -
अभिनेता सिद्धार्थने सानिया नेहवाल हिला लिहिलेल्या पत्रात आपली बाजू मांडली आणि लिहिलं की, "“प्रिय सायना, काही दिवसांपूर्वी तुझ्या एका ट्विटला उत्तर देताना लिहिलेल्या त्या कठोर विनोदासाठी मी माफी मागत आहे. मी अनेक मुद्द्यांवर तुझ्याशी असहमत असू शकतो पण तुझं ट्विट वाचल्यानंतरची नाराजी किंवा राग व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आलेली भाषा आणि स्वर यांच स्पष्टीकरण असू शकत नाही. माझ्यामध्ये यापेक्षा जास्त जाणीव आहे. त्या विनोदाबद्दल स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास तो खूप चांगला विनोद नव्हता. तो योग्यप्रकारे मांडता आला नाही याबद्दल माफी” “मी आग्रहाने सांगू इच्छितो की माझ्या शब्दाचा खेळ आणि विनोदाचा कोणताही दुर्भावनापूर्ण हेतू नव्हता.
पुढे तो म्हणाला की, मी एक स्त्रीवादाचा समर्थक आहे आणि मी खात्री देतो की माझ्या ट्विटमध्ये लिंगभेद नव्हता तसंच एक स्त्री म्हणून तुझ्यावर हल्ला करण्याचा नक्कीच कोणताही हेतू नव्हता. तू हे सर्व मागे सोडून माझं हे पत्र स्वीकारशील अशी आशा आहे. तू नेहमीच एक चॅम्पियन राहशील. प्रामाणिकपणे, सिद्धार्थ,” असंही त्याने या पत्रात म्हटलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.