Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरला मिळाले बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये स्थान; आता घेणार दुप्पट फी

Shraddha Kapoor: 'स्त्री 2' च्या प्रचंड यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरने एकता कपूरच्या आगामी थ्रिलर प्रोजेक्टसाठी आपली फी दुप्पट केली आहे.
Shraddha Kapoor
Shraddha KapoorGoogle
Published On

Shraddha Kapoor : 'स्त्री 2' च्या प्रचंड यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरने एकता कपूरच्या आगामी थ्रिलर प्रोजेक्टसाठी आपली फी दुप्पट केली आहे. या चित्रपटासाठी ती १७ कोटी रुपये घेणार असून, ही तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी फी आहे. या निर्णयामुळे श्रद्धा आता इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ठरली आहे.

'स्त्री 2' मध्ये श्रद्धा कपूरने ५ कोटी रुपये मानधन घेतले होते, तर राजकुमार रावने ६ कोटी रुपये मानधन घेतले होते. या चित्रपटाच्या यशानंतर दोघांनीही आपली फी वाढवली आहे. श्रद्धाने एकता कपूरच्या आगामी थ्रिलर प्रोजेक्टसाठी १७ कोटी रुपये मानधन निश्चित केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल बर्वे करणार असून, २०२५ मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

Shraddha Kapoor
Hrithik Roshan: ऋतिक रोशनच्या 'वॉर 2'चा सीन लीक; ऍक्शन मोडमध्ये दिसला ग्रीक गॉड, व्हिडीओ व्हायरल

फी वाढवण्याबरोबरच श्रद्धा कपूरने या प्रोजेक्टसाठी प्रॉफिट-शेअरिंग क्लॉजवरही साइन केले आहे. यामुळे चित्रपटाच्या कमाईतून तिला एक ठराविक हिस्सा मिळणार आहे. हा करार श्रद्धासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

Shraddha Kapoor
Babil khan: अनन्या, अर्जुनसारखे लोक...; इरफान खान यांच्या मुलाने रडत सांगितले बॉलीवूडचं 'हे' सत्य, नंतर केलं इंस्टाग्राम डिलिज

'स्त्री 2' च्या यशामुळे श्रद्धा कपूरची लोकप्रियता वाढली आहे. या चित्रपटाने जगभरात ८७४ कोटी रुपयांची कमाई केली होती. या यशामुळे श्रद्धा कपूर आता इंडस्ट्रीतील टॉप अ‍ॅक्ट्रेसेसमध्ये गणली जाते. एकता कपूरच्या आगामी थ्रिलर प्रोजेक्टमध्ये तिची भूमिका प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com