Shivrayancha Chhava Poster: 'शिवरायांचा छावा'चे नवं पोस्टर आऊट; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार?

Shivrayancha Chhava: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराज अष्टक' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे. पोस्टर प्रदर्शित होताच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
Shivrayancha Chhava Poster
Shivrayancha Chhava PosterInstagram/ @digpalofficial
Published On

Who Played Role Of Sambhaji Maharaj Role

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'शिवराज अष्टक' हा नवा चित्रपट येत्या आगामी वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आहे.

नुकतंच चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झालं आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा होत आहे.

Shivrayancha Chhava Poster
Ronit Roy Wedding: ५८ वर्षांचा बॉलिवूड अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर, गोव्यातील मंदिरामध्ये केलं लग्न; VIDEO व्हायरल

सप्टेंबर २०२३ मध्ये दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून चित्रपटाची चर्चा सुरु आहे. निर्मात्यांनी पोस्टर शेअर करताना, 'गर्जतो आमच्या देही, रक्त बिंदू रक्त बिंदू, राजे आले आमचे, आले रौद्र शंभू रौद्र शंभू!' असं कॅप्शन देत पोस्टर शेअर केलं आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक बघायला मिळतेय. त्याच्या मागे सिंह दिसत असून पुढे रुद्रावतारात संभाजी महाराज बघायला मिळत आहेत. हा पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा होत आहे.

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट येत्या नव्यावर्षात १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. (Entertainment News)

Shivrayancha Chhava Poster
Sonal Pawar Mehendi Video: 'असा कसा बाई मला तुझा रंग लागला'; ‘रमा राघव’ फेम सोनलच्या हातावर रंगली समीरच्या नावाची मेहंदी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com