अ‍ॅमेझाॅन प्राईमवर 'शेरशाह' चित्रपटाची रेकॅार्ड तोड कामगिरी!
अ‍ॅमेझाॅन प्राईमवर 'शेरशाह' चित्रपटाची रेकॅार्ड तोड कामगिरी!Saam Tv

अ‍ॅमेझाॅन प्राईमवर 'शेरशाह' चित्रपटाची रेकॅार्ड तोड कामगिरी!

'शेरशाह' हा चित्रपट अमेझॉन ओरिजिनल वर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून याला भरभरून प्रेम मिळत आहे.
Published on

मुंबई: 'शेरशाह' Shershah हा चित्रपट अमेझॉन ओरिजिनल वर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून याला भरभरून प्रेम मिळत आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. शिवाय, पहिल्या दोन आठवड्यांत, शेरशाह 4100 हून अधिक नगर आणि शहरांमध्ये तसेच जगातील 210 देशांमध्ये प्रेक्षकांनी स्ट्रीम केला आहे. शेरशाहने IMDb वरील सर्व काळातील सर्वात लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणून एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे.

हे देखील पहा-

याबद्दल निर्माता करण जोहर म्हणाला, "शेरशाह चित्रपट हा नेहमीच आमच्या हृदयाच्या जवळ असेल आणि चित्रपटाला मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून मला चित्रपटाबद्दल आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाबद्दल अभिमान वाटतो. शेरशाह ही पीव्हीसी पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांची कथा आहे. आणि हे कोणताही भारतीय विसरणार नाही.

अ‍ॅमेझाॅन प्राईमवर 'शेरशाह' चित्रपटाची रेकॅार्ड तोड कामगिरी!
Saudi Arabia: सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोन हल्ला; 8 जण जखमी

तसेच करण जोहर म्हणाला, या कथेद्वारे आपल्याला त्याच्या जीवनाची जिद्द, त्याची आवड, त्याचे देशाबद्दलचे प्रेम आणि डिंपल, ज्याने त्याला एक शूर हृदय बनवले दाखवले आहे. सिद्धार्थ आणि कियाराचे अभिनय आणि विष्णूच्या दिग्दर्शनाबद्दलचे प्रेम पाहून मला अभिमान वाटतो. मला आनंद आहे की Amazon प्राइम व्हिडिओमध्ये आम्हाला या चित्रपटासाठी योग्य जोडीदार सापडला, ज्यांनी कोणतीही कसर सोडली नाही आणि या चित्रपटाला योग्य दर्जा दिला. ”

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com