Shefali Jariwala Viral Video : 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा काय होती? तो व्हिडिओ तुफान व्हायरल
Kaanta Laga GirlSaam Tv

Shefali Jariwala Viral Video : 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा काय होती? तो व्हिडिओ तुफान व्हायरल

Kaanta Laga Girl Video : 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचा शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यू नंतर तिचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तिने तिची शेवटची इच्छा सांगितली आहे.
Published on

'कांटा लगा' गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या घटनेने बॉलीवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. वयाच्या ४२व्या वर्षी या अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला. या घटनेनंतर सोशल मीडियावर अभिनेत्री शेफाली जरीवाल आणि तिचा बिग बॉस १३ मधील सह-स्पर्धक पारस छाब्रा यांचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'कांटा लगा गर्ल' अभिनेत्री शेफाली जरीवाल हिचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या जाण्याने बॉलीवूड इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अभिनेत्रीने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे मन जिंकले. २००२ साली आलेल्या 'कांटा लगा' या गाण्यातून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. बिग बॉस १३ मध्येही तिने तिचे कौशल्य दाखवले. तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर तिची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओ मध्ये तिने तिची शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले.

काय होती शेफाली जरीवालची शेवटची इच्छा ?

अभिनेत्री शेफाली जरीवालच्या मृत्यूनंतर तिची सोशल मीडियावर एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत बिग बॉस १३ मधील तिचा सह-स्पर्धक पारस याने तिला 'कांटा लगा गर्ल' म्हणून कधी कंटाळा येतो का? असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्रीने सुंदर उत्तर दिल. ती म्हणाली " "कधीही नाही... संपूर्ण जगात फक्त एकच कांटा लगा गर्ल असू शकते आणि ती मी आहे. मला ती खूप आवडते. आणि प्रेक्षकांनी मला मरेपर्यंत कांटा लगा गर्ल म्हणून ओळखावे"

Shefali Jariwala Viral Video : 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा काय होती? तो व्हिडिओ तुफान व्हायरल
Shefali Jariwala Death: शेफालीच्या निधनानंतर पतीचे रडून रडून बेहाल; हॉस्पिटलबाहेरचा पहिला VIDEO समोर

अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच मिका सिंग, अली गोनी आणि दिव्यांका त्रिपाठी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मिका सिंगने लिहिले की, "मला खूप धक्का बसला आहे, दुःख झाले आहे. आमची प्रिय स्टार आणि माझी सर्वात प्रिय मैत्रीण शेफाली जरीवालाने आपल्याला सोडून गेली आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com