Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा एका जुन्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. काही काळापूर्वी बिपाशा बसूबद्दलचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ती बिपाशाची खिल्ली उडवताना दिसली होती. यामुळे मृणालला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर अभिनेत्रीने माफीही मागितली. आता मृणालचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
मृणाल ठाकूरने कोणाची खिल्ली उडवली?
या व्हिडिओमध्ये ती एका मोठ्या अभिनेत्रीची खिल्ली उडवताना दिसत आहे. मुलाखतीत मृणालला विचारण्यात आले की तिला एका सुपरस्टार अभिनेत्रीमुळे कोणताही प्रोजेक्ट गमवावा लागला का? यावर मृणाल म्हणाली की जर तिने काही सांगितले तर ती वादात सापडेल. पण नंतर ती म्हणाली, 'अनेक. मी स्वतः नकार दिला. कारण मी तयार नव्हतो. पण नंतर मला जाणवले की जर मी तो चित्रपट केला तर मी स्वतःचे नुकसान केले असते. तो चित्रपट सुपरहिट होता पण त्या अभिनेत्रीला चित्रपट सुपरहिट होण्याचा काही फायदा झाला नाही. आता ती काम करत नाहीये पण मी करत आहे. ह्यावरुनच दिसून येत. मला झटपट प्रसिद्धी नको आहे. कारण जी प्रसिद्ध लगेच येते ती निघूनही जाते.'
सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की मृणालने कोणावर टिप्पणी केली. लोक म्हणत आहेत की मृणालने कोणाचे नाव घेतले नसले तरी तिची टिप्पणी अनुष्का शर्माच्या दिशेने आहे. कदाचित मृणाल ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहे तो सुलतान आहे ज्यामध्ये अनुष्काने सलमान खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. असे तर्क सोशल मीडियावर नेटकरी लावतं आहेत.
बिपाशावर टिप्पणी
काही दिवसांपूर्वी मृणालची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती. त्या मुलाखतीत मृणाल बिपाशा बसूच्या शरीरावर टिप्पणी करताना दिसली होती. व्हिडिओ बराच जुना वाटत होता पण बिपाशा बसूंनी कोणाचेही नाव न घेता प्रतिक्रिया दिली. यानंतर मृणालने माफी मागितली आणि तिचे अज्ञान होते असे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.