Yo Yo Honey Singh च्या विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने लावले गंभीर आरोप

पत्नीच्या तक्रारीवरून दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हनी सिंगला नोटीस पाठवून त्याचे उत्तर मागवले आहे.
Yo Yo Honey Singh च्या विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने लावले गंभीर आरोप
Yo Yo Honey Singh च्या विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने लावले गंभीर आरोपFlicr
Published On

दिल्ली: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध गाण्यांसाठी ओळखला जाणारा पंजाबी गायक यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याच्यावर त्याची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) घरगुती हिंसा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हनी सिंगला नोटीस पाठवून त्याचे उत्तर मागवले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पत्नीने यो यो हनी सिंग अर्थात ह्रदेश सिंह याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी हनी सिंगला नोटीस बजावली आहे.

Yo Yo Honey Singh च्या विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने लावले गंभीर आरोप
शुटींग दरम्यान भयानक अपघात; मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले

माध्यमांच्या अहवालानुसार, न्यायालयाने हनी सिंगला 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. यासोबतच शालिनी तलवारच्या बाजूने एक अंतरिम आदेशही पारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये हनी सिंगला दोघांच्या संयुक्त मालमत्तेपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

2014 मध्ये, हनी सिंगने आपल्या पत्नीला रियालिटी शो इंडियाज रोस्टर शोमध्ये पहिल्यांदा मंचावर सर्वांसमोर आणले होते. प्रेक्षकांसाठी ही एक धक्कादायक बाब होती की बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याआधीच हनी सिंगचे लग्न झाले होते. यो यो हनी सिंगने 2011 मध्ये बॉलिवूडमध्ये आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com