मुंबई : प्रसिद्ध खलनायक असणारे अभिनेता Actor मिलिंद शिंदे Milind Shinde हे मोठ्या संकटामधून बचावले आहेत. जयंती या चित्रपटाच्या शुटींगच्या shooting दरम्यान त्यांचा भयंकर अपघात accident होता होता टळला आहे. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान राखल्यामुळे हा जीवघेणा अपघात टळला आहे. यामुळे सेटवर सर्व सदस्याबरोबर मिलिंद शिंदे यांच्या चाहत्यांमध्ये देखील एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मागील कित्येक महिने कोरोनाच्या हाहाकाराने सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे महाराष्ट्रात Maharashtra सर्वत्र मालिका आणि चित्रपटांच्या शुटींगवरती बंदी आली होती. आत्ता काहीशा अटीं आणि नियमानुसार शुटींगला परवानगी मिळाली आहे. यामुळे लॉकडाऊन Lockdown मधील रखडलेल्या प्रोजेक्ट्सचे तसेचं नवीन काही प्रोजेक्ट्स Projects देखील शुटींग सुरु करण्यात आले आहे.
हे देखील पहा-
याप्रमाणे मराठी मधील जयंती या चित्रपटाच्या राहिलेल्या भागाचे देखील शुटींग केले जात आहे. या दरम्यान अभिनेता मिलिंद शिंदे बरोबर सेटवर एक भयानक किस्सा घडलेला आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार सेटवर मोठ- मोठे लाईटस, विविध अवजड यंत्रणा, जिमी जीब क्रेन असंख्य कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, अभिनेता मिलिंद शिंदे नेहमीप्रमाणे आपल्या सीनकरिता अगदी मग्न होऊन सराव करत होते.
त्यांचे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर शूटिंगमुळे अजिबात लक्ष नव्हते. आणि त्याचवेळी जिमी जीब क्रेनचा देखील पुढील सीनकरिता सराव सुरु होता. एका सीनसाठी जिमी जीब क्रेनला अतिवेगाने खाली येण्याचा शॉटचा सराव सुरु होता. ही क्रेन खाली येत असतानाच त्याच्याखालीच मिलिंद शिंदे थांबलेले होते. क्रेन ऑपरेटरला मिलिंद दिसताच त्याने प्रसंगावधान राखत, त्या क्रेनला अतिशय चतुराईने दुसऱ्या दिशेनं वळवले आणि त्यावेळी पटकन मिलिंदसुद्धा खाली वाकल्याने हा भयानक प्रसंग टळला आहे.
अन्यथा यामध्ये मिलिंद शिंदे यांना मोठी दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र, दैव बलवत्तर म्हणून सर्वकाही व्यवस्थित झाले आहे. याबद्दल मिलिंद शिंदे सांगत होते की, एखादं चांगचे काम आपल्या हातून घडत असेल तर तेव्हा संकटाची सावली सुद्धा आपल्यावर पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेत म्हणजेच तयारीत रमून गेल होतो. रात्रीच्या वेळी माझ्या आजू- बाजूला चालत असलेल्या गोष्टी देखील मला या क्षणासाठी दिसले नाही.
मग ती मोठी जिमी जीब का असेना, मी त्याचवेळी जर वाकलो नसतो, तर त्या लोखंडी जिमी जीबच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती. सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेने मला खरचटले देखील नाही. सेटवर लोकांनी वेळेतच दाखवलेल्या प्रसंगामुळे माझं जीव वाचले आहे. मी जरी माझ्या कामात रमलो असलो, तरी सेटवर प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केले आहे याचे मला खूप कौतुक वाटते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.