Shah Rukh Khan: 'हे मी मागच्या अनेक वर्षांत पाहिलं नव्हतं...' शाहरुखची ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 'ही' पोस्ट चर्चेत...

दमदार ऍक्शन आणि जबरदस्त व्हिएफएक्स असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanTwitter

Shah Rukh Khan: शाहरुख खान अभिनित 'पठान' चित्रपटाची सध्या सर्वत्रच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी पासून भारतात प्रदर्शित होणार आहे. गाण्यांमुळे ट्रोल झालेल्या चित्रपटाचा प्रेक्षकांनी ट्रेलर पाहताच काही वेळातच त्याला जबरदस्त व्हयुज मिळाले होते. दमदार ऍक्शन आणि जबरदस्त व्हिएफएक्स असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. त्यामुळे प्रत्येकालाच चित्रपटाची कमालीची उत्सुकता लागली आहे.

Shah Rukh Khan
Varisu Movie: थलपथी विजयच्या 'वरिसू' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पिछेहाट, पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ

सध्या शाहरुख बराच सोशल मीडियावर सक्रिय आहे. अनेकदा त्याने सोशल मीडियावर 'AskSrk' हे सेशन घेतले होते. आता पुन्हा एकदा त्याने हे सेशन सोशल मीडियावर घेतले. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नाचे उत्तर दिले. त्यातच एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या ‘पठान’ चित्रपटातील एक फोटो आणि त्याबरोबरच त्याच्या ‘फौजी’ आणि ‘कल हो ना हो’ चित्रपटातील सॅल्युटचा एक फोटो कोलाज करत तुझ्या प्रवासासाठी एक शब्द कोणता असेल असं विचारलं होतं.

Shah Rukh Khan
Farzi Trailer Out: शाहिद कपूर-विजय सेतुपती डिजिटल डेब्यूसाठी सज्ज, 'फर्जी'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

शाहरुखने त्या प्रश्नावर “अरे व्वा! हे मी मागच्या अनेक वर्षांत पाहिलं नव्हतं. सॅल्युट करताना नेहमीचा भावनिक क्षण!” असं उत्तर दिलं. चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरुख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत.

दमदार ऍक्शन असणाऱ्या या चित्रपटाचे एकूण २५० कोटी इतका बजेट असल्याची चर्चा आहे. सोबतच शाहरुखनेही चित्रपटासाठी जबरदस्त मानधन घेतले असल्याचे बोलले जात आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्याने सर्वच चाहते उत्सुक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com