Shah Rukh Khan Upcoming Movie: 'जवान'चे शूटिंग संपले: शाहरुख शिकतोय चिकन 65ची रेसिपी

ट्विट करत शेअर केला शाहरुख खानने त्याचा शूटिंगचा अनुभव, रजनीकांतचे मानले आभार.
Shah Rukh Khan is currently busy shooting for his upcoming film Dunki
Shah Rukh Khan is currently busy shooting for his upcoming film DunkiSaam Tv

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचे सलग तीन चित्रपट (Movie) येणार आहेत. नुकतेच त्याने 'जवान' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा अनुभव शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

किंग खानने ट्वीट करत त्याचा अनुभव चाहत्यांना सांगितला आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे, "काय जबरदस्त ३० दिवस होते! खुद्द रजनीकांत आमच्या सेटवर आले हे आमचे सौभाग्य आहे... नयनतारासोबत चित्रपट पाहिला तर अनिरुद्धबरोबर पार्टी केली, विजय सेतुपती आणि थलापती यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. विजयने स्वादिष्ट जेवण खाऊ घातलं. एटली आणि प्रिया तुम्ही माझा उत्तम पाहुणचार केलात त्याबद्दल खूप खूप आभार आता मला चिकन ६५ (Chicken 65) बनवण्याची रेसिपी शिकण्याची गरज आहे!"

'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शन एटली कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खानने केली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट या चित्रपटाचे सादरकर्ते आहेत. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली होती. 'जवान' चित्रपट २ जून, २०२३ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये पाहता येणार आहे.

Shah Rukh Khan is currently busy shooting for his upcoming film Dunki
Ram Setu: अक्षयचा बहुप्रतिक्षित 'रामसेतू' लवकरच येणार; सिनेमा हिट करण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग

शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुखचा 'पठाण' चित्रपटा २५ जानेवारी, २०२३ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम सुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहेत. 'पठाण' चित्रपटाव्यतिरिक्त राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या आगामी चित्रपटात शाहरुख खान तापसी पन्नूसह दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com