Suhana Khan Birthday: शाहरुखने लेकीला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा...

Suhana Khan turns 23: किंग खानची मुलगी आज 23 वर्षांची झाली आहे.
Shah Rukh Khan wishes Suhan Khan
Shah Rukh Khan wishes Suhan KhanSaan TV

Shah Rukh Khan Shared Suhana Khan Video: शाहरुख खानची मुलगी सुहाना देखील नेहमी चर्चेत असते. सुहाना खान नुकतीच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली आहे. असे असले तरी तिची फॅन फॉलोइंग खूप जबदस्त आहे.

22 मे रोजी सुहाना खानचा वाढदिवस असतो. किंग खानची मुलगी आज 23 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवशी तिला अनेकजण शुभेच्छा देत आहेत, परंतु तिच्या वाढदिवसाची सर्वाधिक चर्चा होत आहे आणि सुहानाचे वडील शाहरुख खान यांच्या पोस्टची. (Latest Entertainment News)

Shah Rukh Khan wishes Suhan Khan
Actor Sarath Babu Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा! 5 दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याचं निधन

शाहरुख खानने मुलगी सुहानाला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपल्या कुटुंबाचे आणि मुलांचे फोटो शेअर करत असतो.

शाहरुख खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सुहाना खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुहाना खूप सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना किंग खानने मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये सुहाना ब्लॅक टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसत आहे. सुहानाने स्केट्स घातले आहे आणि ती गोल-गोल फिरत आहे. तर मोकळ्या केसात सुहाना खान खूप गोड दिसत आहे. मुलीचा हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुख खानने कॅप्शनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने लिहिले आहे, 'आज तुझा आनंदाचा दिवस आहे....आणि कायम असेल. आय लव्ह यू बेबी.' (Viral Video News)

शाहरुख खानच्या या पोस्टवर सुहाना खानने कमेंट केली आहे. तिने आधी 'हेहेहे' म्हणत चिडवणाऱ्या इमोजीसह हार्ट कमेंट केला आहे. त्यानंतर 'लव्ह यू द मोस्ट' अशी कमेंट करत शाहरुखवरचे प्रेम व्यक्त केले आहे.

सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. सुहाना खान व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर देखील या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. (Latest Tech News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com