
Mufasa: The Lion King : 'मुफासा: द लायन किंग'ची चर्चा संपूर्ण जगभर सुरु आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत देशभरातील अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे, तर जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून 'पुष्पा 2' साठी हा चित्रपट उत्तम स्पर्धक आहे. मात्र, 'मुफासा'सोबतच हिंदी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटही प्रदर्शित झाले, ज्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. पण नवव्या दिवशीही मुफासा सर्वाधिक कमाई करत आहे.
20 डिसेंबर रोजी 'मुफासा: द लायन किंग', 'विदुथलाई 2', 'मार्को', 'वनवास' आणि UI थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. हे सर्व चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. या सर्व चित्रपटांपैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, पण काही चित्रपट फ्लॉप ठरले, त्यात नाना पाटेकर यांच्या 'वनवास'चा समावेश आहे. साऊथमध्येही 'मुफासा'ची भुरळ लोकांना पडली आहे, तर निर्मात्यांना साऊथ स्टार विजय सेतुपतीच्या 'विदुथलाई 2' कडून खूप आशा होत्या. वॉल्ड डिस्नेच्या मुफासा या चित्रपटाविषयी सांगायचे तर, या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत शाहरुख खान आणि त्याच्या दोन मुलांनी आवाज दिला आहे.
चित्रपटांची नवव्या दिवसाची कमाई
‘विदुथलाई २’ आणि मुफासाची सुरुवात चांगली झाली होती, पण दुसऱ्या आठवड्यापासून ‘मुफासा’ने या चित्रपटाला मागे टाकले. मात्र, 'विदुथलाई'चा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याचे कलेक्शनही खूप चांगले झाले आहे. 'मुफासा'च्या नवव्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर, चित्रपटाने 9.5 कोटींची कमाई केली आहे, जी आठव्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. तर विदुथलाई 2 ने 1.20 कोटी रुपये कमावले आहेत, त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 34.26 कोटींवर पोहोचली आहे.
मार्कोला चांगला प्रतिसाद मिळत आहे
या सर्व चित्रपटांमध्ये मल्याळम चित्रपट 'मार्को'नेही चांगले कलेक्शन केले आहे. हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याने नवव्या दिवशी 2.70 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, रिव्ह्यूनुसार चित्रपटात जबरदस्त ॲक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत. तर कन्नड सायन्स फिक्शन फिल्म यूआयने आठव्या दिवशी 95 लाख रुपये इतकेच कलेक्शन केले आहे. नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा यांच्या 'वनवास' चित्रपटाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर चित्रपटाने नवव्या दिवशी केवळ 19 लाखांची कमाई केली आहे. या चित्रपटाने सुरुवातीच्या दिवसापासून खूपच कमी कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.